आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुसऱ्या लाटेनंतर, थिएटर्स हळूहळू सुरू झाल्यामुळे मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा रुळावर येत असताना ओमायक्रॉनचे संकट उभे ठाकले आहे. कोरोना विषाणूच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये मनोरंजन सृष्टीला पुन्हा एकदा बॅकफूटवर नेले आहे. भारतात सतत वाढत असलेल्या कोविड प्रकरणांमुळे, देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत, त्यामुळे जानेवारीमध्ये प्रदर्शित होणा-या बहुतेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे.
आरआरआर
एस एस राजामौली दिग्दर्शित पॅन इंडियाचा 'आरआरआर' हा चित्रपट येत्या 7 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. निर्मात्यांनी एका आठवड्यापूर्वी जाहीर केले होते की चित्रपट कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलला जाणार नाही, मात्र अनेक ठिकाणी चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे निर्मात्यांनी रिलीजच्या तीन दिवस आधी चित्रपट पुढे ढकलला आहे. रिलीज पुढे ढकलण्यात आल्याने निर्मात्यांना सुमारे 50 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि रामचरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राधेश्याम
प्रभास आणि पूजा हेगडे यांचा राधे-श्याम हा चित्रपटही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. 5 जानेवारीला चित्रपट पुढे ढकलण्यामागे निर्मात्यांनी कोविडची वाढती प्रकरणे हे कारण दिले आहे.
पृथ्वीराज
अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'पृथ्वीराज' 21 जानेवारी रोजी रिलीज होणार होता, मात्र आता त्याचे प्रदर्शनदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. निर्मात्यांनी सोमवारी चित्रपट पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांचे म्हणणे आहे की हा एक मोठा चित्रपट आहे जो कोविडच्या काळात प्रदर्शित करून काही उपयोग होणार नाही.
जर्सी
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर स्टारर जर्सी हा चित्रपट येत्या 31 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता, मात्र, कोरोनाच्या काळातील '83'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून निर्मात्यांनी त्याचे रिलीज पुढे ढकलले आहे. हा चित्रपट कोणत्या महिन्यात प्रदर्शित होणार याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या चित्रपटांच्या शूटिंगवर झाला परिणाम
पोन्नियन सेल्वन
मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन या चित्रपटाचे शूटिंग या महिन्यापासून मध्य प्रदेशात सुरू होणार होते, परंतु ते स्थगित करण्यात आले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत आहे.
लुका छुपी 2
विकी कौशल आणि सारा अली खानीच्या लुका छुपी 2 चे चित्रीकरण 27 जानेवारीपर्यंत इंदूरमध्ये होणार होते, परंतु वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निर्माते एका आठवड्यात शूटिंग पूर्ण करतील.
कतरिनाचा अद्याप शीर्षक न ठरलेला चित्रपट
भोपाळजवळील झाबुआमध्ये विपुल शाह कतरिना कैफसोबत नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार होते, मात्र त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मेरी ख्रिसमस
कतरिना कैफच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत 7 जानेवारीपासून सुरु होणार होते. चित्रपटासाठी रात्रीचे बहुतांश दृश्य शूट केले जाणार होते, मात्र नाइट कर्फ्यूमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी चित्रीकरण करू नये, अशा कडक सूचना स्टुडिओ मालकांना देण्यात आल्या आहेत.
मल्याळम चित्रपटाचा रिमेक
जॉन अब्राहम आणि कार्तिक आर्यन स्टारर आगामी मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे शूटिंग रखडले आहे. शूटिंग उत्तराखंडमध्ये होणार होते, पण सध्या तिथे नाइट कर्फ्यू आहे.
पठाण
शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून स्पेनमध्ये होणार होते, परंतु कोविडमुळे ते रद्द करण्यात आले आहे. युरोपमध्ये ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे निर्माते जानेवारीऐवजी फेब्रुवारीमध्ये स्पेनसाठी वेळापत्रक आखत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.