आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 हे वर्ष सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींसाठीही आव्हानात्मक राहिले. अनेक सेलिब्रिटींना मागील वर्षी लग्न करुन सेटल व्हायचे होते, मात्र कोरोनामुळे, अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. परंतु 2021मध्ये त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कोणते सेलिब्रेटी यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकू शकतात, पाहूया…
रणबीर कपूर-आलिया भट्ट
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रणबीर आणि आलिया साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. हे दोघेही आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी रणथंभोरला गेले होते, तेव्हा ते साखरपुडा उरकूनच परततील अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की रणबीर-आलिया 2021 मध्ये लग्न करतीस. रणबीर कपूरनेही एका मुलाखतीत याचे संकेत देताना म्हटले होते की कोरोनाची परिस्थिती नसती तर 2020 मध्ये त्याने आलियाशी लग्न केले असते. आता लवकरच लग्न करण्याचा त्यांचा विचार आहे.
वरुण धवन-नताशा दलाल
वरुण धवन 2021 मध्ये त्याची बालमैत्रीण नताशासोबत लग्न करु शकतो. 2020 मध्ये हे दोघे लग्न करतील अशी अपेक्षा होती पण कोरोनामुळे ते होऊ शकले नाही आणि 2021 मध्ये हे विवाह बंधनात अडकतील, असे म्हटले जात आहे.
अली फजल-रिचा चड्ढा
रिचा आणि अलीचेही एप्रिल 2020 मध्ये लग्न झाले होते, परंतु कोरोना लॉकडाऊनमुळे दोघांनी त्यांचे लग्न लांबणीवर टाकले. अलीच्या आईचेही 2020 मध्ये निधन झाले होते. आता दोघांचे लग्न 2021 मध्ये होईल, असे म्हटले जात आहे. एका मुलाखतीत रिचाने म्हटले होते की, कोरोनाची लस येईपर्यंत ती आणि अली लग्न करणार नाहीत.
मलायका अरोरा-अर्जुन कपूर
अर्जुन आणि मलायका जवळपास दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यावेळी, त्यांच्या लग्नाच्या अफवा बर्याच वेळा ऐकायला मिळाल्या. परंतु असे म्हटले जात आहे की, 2021 मध्ये हे दोघे लग्न करू शकतात. त्यांनी लॉकडाऊनमध्ये संपूर्ण वेळ एकत्र घालवला आणि दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात गेले होते.
सुष्मिता सेन-रोहमन शॉल
सुष्मिता गेल्या दोन वर्षांपासून मॉडेल रोहमन शॉल याला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इनमध्ये राहत आहेत आणि यावर्षी त्यांच्या लग्नाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नुकतेच रोहमन आणि सुष्मिता परिवारासह दुबईला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गेले होते. जिथे सुष्मिताच्या वहिनीने एका व्हिडिओत रोहमनचा उल्लेख जीजू म्हणून केला होता. रोहमन सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.