आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2022 मधील सर्वाधिक महागडे चित्रपट:RRR, पोन्नियिन सेल्वन ते आदिपुरुषपर्यंत, 300 कोटींहून अधिक बजेट असलेले हे चित्रपट यावर्षी येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वर्षातील सर्वाधिक बजेट असलेले चित्रपट कोणते आहेत-

2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांचे बजेट 300 कोटींहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत असे अनेक बिग बजेट चित्रपट आले आहेत, ज्यामध्ये प्रोडक्शन हाऊसने भरमसाठ पैसा गुंतवला आहे. चला जाणून घेऊया, या वर्षातील सर्वाधिक बजेट असलेले चित्रपट कोणते आहेत-

  • पोन्नियिन सेल्वन

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला हा तामिळ चित्रपट या वर्षातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट आहे. लायका प्रॉडक्शन आणि मद्रास टॉकीज निर्मित या चित्रपटाचे बजेट 500 कोटी आहे. या चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवी, त्रिशा, जयराम, शोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी आणि विक्रम प्रभू असे अनेक मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'पोन्नियिन सेल्वन'चे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले आहे. हा चित्रपट 1955 मधील कल्की कृष्णमूर्ती यांच्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे. चोलच्या राजावर आधारित हा ऐतिहासिक-काल्पनिक चित्रपट आहे.

  • आदिपुरुष

रामायणावर आधारित या चित्रपटाचे बजेट तब्बल 500 कोटी आहे. हा एक 3D चित्रपट आहे जो T-Series आणि रेट्रोफाइल्स प्रोडक्शन द्वारे निर्मित आहे. याचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या प्रोजेक्टमध्ये VFX साठी हॉलिवूड तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट आधी 11 ऑगस्ट 2022 होती, जी लाल सिंग चड्ढा या चित्रपटासोबत क्लॅश होणार होती. त्यामुळे याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. 'आदिपुरुष' हिंदी आणि तेलुगूसह तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब करण्यात आला आहे.

  • RRR

'RRR' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत, तर अजय देवगण आणि आलिया भट्ट कॅमिओमध्ये दिसणार आहेत. एस.एस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट तब्बल 400 कोटी आहे. हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट आधी 30 जुलै 2020 होती, पण कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट निर्मात्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाचा इंटरव्हल सीक्वेन्स 65 दिवसांत पूर्ण झाला होता. ज्याचा दिवसाचा खर्च 75 लाख होता.

  • राधेश्याम

350 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. राज विश्वकर्मा आणि रिद्धी कुमार हे देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. हा चित्रपट 1970 च्या दशकातील युरोपमधील रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाचे चित्रीकरण तेलुगू आणि हिंदीमध्ये झाले आहे. यासह हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'राधे श्याम' 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.

  • पृथ्वीराज

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे बजेट ३०० कोटी आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे. तसेच मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद, आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  • ब्रह्मास्त्र

अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे संगीत प्रीतमने दिले आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' ठेवण्यात आले होते, मात्र नंतर 'ब्रह्मास्त्र' हे नाव निश्चित करण्यात आले. नुकत्याच एका मुलाखतीत चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने सांगितले होते की, या चित्रपटाचे शीर्षक 'ब्रह्मास्त्र' प्राचीन ज्ञान, ऊर्जा आणि शक्तीशी संबंधित आहे.

बातम्या आणखी आहेत...