आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मृत्यूच्या दाढेतून परतले सेलिब्रिटी:सलमान, हृतिकपासून ते सनी लिओनीपर्यंत, शूटिंगदरम्यान जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावले हे बॉलिवूड सेलेब्स

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊयात या सेलिब्रिटींविषयी..

बॉलिवूड सेलेब्स आपले मनोरंजन करण्यासाठी खूप कष्ट घेतात. अनेकदा बॉडी डबल्सचा वापर करुन हे सेलिब्रिटी चित्रपटातील थरारक स्टंट सीन्स करुन घेत असतात. मात्र कधी कधी हे सेलिब्रिटी स्वतःसुद्धा अ‍ॅक्शन सीन्स करतात. हे सीन्स करताना मात्र काही सेलिब्रिटी थोडक्यात बचावले. जाणून घेऊयात या सेलिब्रिटींविषयी..

सलमान खान
सलमान खानने स्वत: त्याच्या आयुष्यातील हा अनुभव शेअर केला होता. तेरे नाम या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान थोडक्यात बचावला होता. 'तेरे नाम' (2003) या चित्रपटातील एका दृश्यात सलमानला रेल्वे ट्रॅकवर चालायचे होते. पण सलमान हा सीन करण्यात एवढा गुंग झाला की, ट्रेन समोरुन येतेय, हे त्याच्या लक्षात आले नाही. सुदैवाने त्याच्या एका को-स्टारने त्याला धक्का देऊन रेल्वे रुळाच्या खाली ढकलले होते. आणि सलमानचा जीव थोडक्यात वाचला होता.

लारा दत्ता
माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ताने अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत लारासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला होता. सुनील यांनी सांगितले होते, 'चित्रपटाचा काही भाग दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे चित्रीत करण्यात आल होता. या चित्रपटातील रब्बा इश्क ना होवे हे गाणे येथे चित्रीत झाले होते, जे बरेच गाजले होते. गाण्यातील काही भाग लारा आणि अक्षयने समुद्रांच्या लाटांवर चित्रीत केले. खरं तर लारा पाण्याला खूप घाबरते पण तिने गाण्यासाठी ही जोखीम उचलण्याचा निर्णय घेतला होता. शूटिंगच्या वेळी सर्व सावधगिरी बाळगण्यात आली होती. मात्र एक मोठी लाट आली आणि त्यावेळी लारा स्वतःला बॅलेन्स करु शकली नाही आणि ती लाटेत वाहत गेली. यावेळी अक्षयने पाण्यात उडी मारुन लाराचा जीव वाचवला होता.'

अमिताभ बच्चन
26 जुलै 1982मध्ये बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' चित्रपटाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना चित्रपटासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला. मात्र तरीदेखील ते शूटिंग करत राहिले. त्याच्या पुढील सीनमध्ये बिग बींना टेबलवर उडी मरायची होती, परंतु त्यांनी उडी मारताच टेबलचा एक कोपरा त्यांच्या पोटात लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. घटनेनंतर लोकांमध्ये त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यांच्यावब बंगळुरुच्या हॉस्पिटलमध्ये एक शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. येथेही त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तब्बल 63 दिवस त्यांचा जीवन मृत्यूशी संघर्ष सुरु होता. 24 सब्टेंबर 1983 रोजी ते बरे होऊन घरी परतले होते.

सनी लिओनी
वन नाइट स्टँड या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी लिओनी आणि तनुज यांच्यात समुद्रात एक रोमँटिक सीन चित्रीत करण्यात आला होता. शूटिंगदरम्यान समुद्राच्या लाटा आल्या आणि दोघेही त्यात बुडत होते. टीमने त्यांना दोनदा वाचवण्याचा प्रयत्न केला, पण लाटा उसळत असल्याने ते दोघेही पाण्यात बुडत होते. त्यावेळी तेथील रेस्क्यू टीमच्या मदतीने दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले होते.

आयशा टाकिया
डोर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आयशा टाकिया मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली होती. चित्रपटाच्या एका दृश्यात आयशाला चालत्या ट्रेनमध्ये चढायचे होते. मात्र त्याच वेळी तिचा पाय घसरला आणि ती रेल्वे रुळावर पडली. तेथून दुसरी ट्रेन जात होती. पण तिच्या टीमने तिला तेथून बाहेर काढले होते.

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या रायसुद्धा एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली होती. 2004 मध्ये 'खाकी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका अनकंट्रोल जीपने तिला धडक दिली होती. त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला जाऊन झाडा-झुडपात पडली होती. तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

सैफ अली खान
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत क्या कहना या चित्रपटाच्या सेटवर दुर्घटना घडली होती. बाइक चालवत असताना सैफचा बॅलेन्स बिघडला आणि तो जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नर्गिस दत्त
मदर इंडिया या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नर्गिस दत्त आगीत अडकल्या होत्या. त्यावेळी सुनील दत्त यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांना या आगीतून सुखरुप बाहेर काढले होते.

हृतिक रोशन 2013 मध्ये बँग-बँग या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याने पेन-किलर्स खाऊन शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्रास जाणवू लागल्यानंतर त्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करुन डोक्यातील रक्ताची गाठ काढावी लागली होती. यानंतर हृतिक काही आठवडे बेड रेस्टवर होता. प्रकृती ठिक झाल्यानंतर तो शूटिंगवर परतला होता.

बातम्या आणखी आहेत...