आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाक्षिणात्य अभिनेत्रींची बॉलिवूडकडे वाटचाल:सामंथापासून ते रश्मिका मंदानापर्यंत, 2022 मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसणार या दाक्षिणात्य अभिनेत्री, अनेक चित्रपटांमध्ये झळकणार!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोण आहेत या अभिनेत्री...

हिंदी बेल्टमध्ये दाक्षिणात्य चित्रपट चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळेच साऊथचे अनेक मोठे स्टार्सही बॉलिवूडकडे वळत आहेत. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्रीही मागे नाहीत. 2022 मध्ये अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री देखील मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहेत आणि त्या बॉलिवूड अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसणार आहेत.

2021 मध्ये 'द फॅमिली मॅन 2' या वेब सीरिजमध्ये राजीची भूमिका साकारल्यानंतर सामंथाची लोकप्रियता बॉलिवूडमध्येही खूप वाढली. यामुळेच अनेक बड्या दिग्दर्शकांना तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. सामंथाने तापसी पन्नूसोबत अद्याप शीर्षक न ठरलेला चित्रपट साइन केल्याचे वृत्त आहे.

अलीकडेच साऊथच्या गाजलेल्या 'पुष्पा' चित्रपटात दिसलेली रश्मिका या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे.

श्रिया प्रकाश राज यांच्या रोमँटिक कॉमेडी ड्रामामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. यात नाना पाटेकर आणि तापसी पन्नू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

नयनताराही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ती शाहरुख खानसोबत दिग्दर्शक एटलीच्या एका अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.

'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधील भूमिकेतून कौतुकाची थाप मिळवणारी प्रियामणी आता अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये दिसणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडे 2022 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. ती 'जयेशभाई जोरदार'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

इलियाना शिरीष गुहा यांच्या आगामी अनटायटल्ड चित्रपटात दिसणार आहे, यात विद्या बालन आणि प्रतीक गांधी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...