आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब्स आणि आत्महत्या:संदीप नाहरपासून ते सुशांत सिंह राजपूतपर्यंत,  कमी वयातच या सेलिब्रिटींनी आत्महत्या करुन घेतला जगाचा कायमचा निरोप

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक सेलिब्रिटींनी अगदी कमी वयातच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप अवघ्या 32 वर्षांचा होता. वैयक्तिक कारणामुळे संदीपने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. संदीपपूर्वी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी अगदी कमी वयातच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.

सुशांत सिंह राजपूत - 34 वर्षे

गेल्यावर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतने नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र नंतर सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. इतकेच नाही तर सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर पैशांची अफरातफर केल्याचाही आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे, मात्र वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

प्रत्युषा बॅनर्जी - वय 25 वर्षे

'बालिका वधू'ची 'आनंदी' उर्फ प्रत्युषा बॅनर्जी 1 एप्रिल 2016 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटवर गळफास घेतलेल्या अवस्थे आढळून आली होती. कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिचा प्रियकर राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. प्रत्युषावर प्राणघातक हल्ला केल्याचाही राहुलवर आरोप होता. मृत्यूच्या वेळी प्रत्युषा 25 वर्षांची होती.

जिया खान - वय 24 वर्षे

'निशःब्द', हाऊसफुल 'आणि' गजनी 'सारख्या चित्रपटात झळकलेली जिया खान 3 जून 2013 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी जुहूच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे वाटले होते. पण नंतर जियाच्या आईने सूरज पंचोलीवर जियाच्या खुनाचा आरोप केला. वृत्तानुसार मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी जिया गर्भवती होती. प्रियकर सूरजने जियाला गर्भपात करण्याचे औषध दिले. सूरजने टॉयलेटमध्येही भ्रूण टाकले होते. असे म्हणतात की, या घटनेनंतर जिया पुरती कोलमडली होती. सूरजनेही तिच्यापासून अंतर निर्माण करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर जिया नैराश्यात गेली. काही दिवसांनी तिने आत्महत्या केली.

सिल्क स्मिता - वय 36 वर्षे

3 सप्टेंबर 1996 रोजी दक्षिण चित्रपटातील अभिनेत्री सिल्क स्मिताचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. त्यावेळी ती 36 वर्षांची होती. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्या सांगून बंद केले. अनेकांचा असा विश्वास होता की, तिच्या मृत्यूमागे कारण काहीतरी वेगळंच आहे. असे म्हणतात की, सिल्कने चित्रपटांमधील अभिनय आणि गाण्यांमधून चांगली कमाई केली. तिच्या जवळच्या काही मित्रांनी तिला निर्माता बनून पैसे कमवण्याचे आमिष दाखविले. पहिल्या दोन चित्रपटात तिचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. निर्माता म्हणून तिचा तिसरा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. चित्रपटांमधील तोट्यांचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आणि ती मानसिकदृष्ट्या दुर्बल झाली होती.

नफिसा जोसेफ - वय 26 वर्षे

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल नफिसा जोसेफ हिचा मृत्यू एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. 1997 मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा मुकुट मिळविणा-या नफिसाने 2004 मध्ये वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी घेतली होती. नफिसाने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती, परंतु तिने अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. एमटीव्हीवर शो होस्ट करण्याचीही तिला संधी मिळाली होती. नफिसा बॉलिवूड चित्रपट 'ताल' आणि टीव्ही शो 'सी.ए.टी.एस.' मध्ये देखील दिसली होती.

विवेका बाबाजी - वय 37 वर्षे

2002 मध्ये आलेल्या 'ये कैसी मोहब्बत' हा एकमेव चित्रपट होता ज्यामध्ये विवेका बाबाजीने अभिनय केला होता. 37 वर्षीय विवेका 25 जून 2010 रोजी मुंबईतील तिच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विवेकाचा आत्महत्येचा हा तिसरा प्रयत्न होता. ज्यामध्ये ती यशस्वी झाली. 1993 मध्ये मिस मॉरिशस वर्ल्डचा किताब पटकावणा-या विवेकाने आत्महत्या का केली हा सर्वांच्या चर्चेचा विषय राहिला. आपल्या प्रियकरापासून विभक्त झाल्यानंतर ती नैराश्यात राहिल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि कदाचित म्हणूनच तिने स्वत:चे आयुष्य संपवले होते.

बातम्या आणखी आहेत...