आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टार किड्सची बॉलिवूडमध्ये एंट्री:शाहरुख खानची मुलगी सुहानापासून ते बिग बींचा नातू अगस्त्य नंदापर्यंत, हे स्टार किड्स 2021 मध्ये करु शकतात बॉलिवूडमध्ये पदार्पण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक स्टार किड्सची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंगदेखील आहे.

2020 मधील लॉकडाऊन आणि कोविड -19 मुळे अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकले नाहीत. मात्र 2021 या नवीन वर्षांत बरेच स्टार किड्स चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. अनेक स्टार किड्सची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंगदेखील आहे. चला तर मग जाणून घेऊयात यावर्षी कोणते नवे चेहरे सिल्व्हर स्क्रिनवर जादू दाखवतील -

अहान पांडे - अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे यावर्षी चित्रपटात दिसू शकतो. रिपोर्ट्सनुसार अहान यशराज फिल्म्स प्रोडक्शनद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणार आहे.

आर्यन खान- शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. शाहरुखच्या मुलाने अभिनयात हात आजमावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. यावर्षी आर्यन करण जोहरच्या आगामी स्टुडंट ऑफ द इयर 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकेल अशी चर्चा आहे.

अगस्त्य नंदा- अगस्त्य नंदा लवकरच चित्रपटांमध्ये येणार असल्याची बातमी आहे. अगस्त्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन नंदा-निखिल नंदा यांचा मुलगा आहे. अलीकडेच करण जोहरसह तो एका पार्टीत स्पॉट झाला होता.

सुहाना खान- शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडिया पेजवर तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाइलमुळे ओळखली जाते. यावर्षी ती बॉलिवूडमध्येही पाऊल टाकू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी सुहाना खानने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या लघुपटात आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केला आहे.

शनाया कपूर- अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेसारखे चित्रपटांत करिअर करायचे आहे. बातमीनुसार शनाया यावर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेऊ शकते. जान्हवी कपूर स्टारर 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाची ती सहाय्यक दिग्दर्शक होती.

खुशी कपूर- जान्हवी कपूरनंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरही चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकते. खुशी ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह असते.

बातम्या आणखी आहेत...