आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड तारे-तारकांचे कमबॅक:शाहरुख खान, फरदीन खानपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत, 2021 मध्ये धमाकेदार कमबॅक करण्यास सज्ज आहेत हे लोकप्रिय स्टार्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी कोणते कलाकार कमबॅक करत आहेत, हे जाणून घेऊया.

बॉलिवूड इंडस्ट्रीतून सध्या बरेच मोठे चेहरे गायब आहेत. काही स्टार ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाल्याने मोठ्या पडद्यापासून दूर गेले, काही फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर मोठ्या कमबॅकच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु आता ही प्रतीक्षा वर्ष 2021 मध्ये संपणार आहे, कारण यावर्षी बिग बजेट चित्रपटांमधून अनेक लोकप्रिय कलाकार पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. यावर्षी कोणते कलाकार कमबॅक करत आहेत, हे जाणून घेऊया.

शाहरुख खान

2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत दिसलेला शाहरुख खान गेल्या 2 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. दरम्यान, शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीने 'बार्ड ऑफ ब्लड' ची निर्मिती केली पण प्रेक्षकांना त्याचा अभिनय पाहण्याची संधी मिळाली नाही. आता ब-याच दिवसानंतर अभिनेता एक दोन नव्हे तर अनेक चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे. शाहरुखचा 'पठाण' आणि 'स्पाय युनिव्हर्स' हे चित्रपट यंदा रिलीज होणार आहे. याशिवाय तो अॅट ली आणि राजकुमार हिराणी यांच्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. चाहत्यांची दोन वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

उर्मिला मातोंडकर

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 12 वर्षानंतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीत उर्मिलाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2021 मध्ये ती कमबॅक करत आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ईएमआय चित्रपटात तिने शेवटची मुख्य भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त उर्मिलाने 2018 मध्ये आलेल्या ब्लॅकमेल चित्रपटात बेवफा ब्युटी हा डान्स नंबर केला होता.

शिल्पा शेट्टी​​​​​​​​​​​​​​

2014 च्या फ्लॉप ठरलेल्या ‘ढिशक्याऊं’ या चित्रपटात दिसल्यानंतर शिल्पा लवकरच कमबॅक करणार आहे. यावर्षी रिलीज होणा-या हंगामा 2 या कॉमेडी चित्रपटात शिल्पा झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासह परेश रावल, मिजान जाफरी आणि प्रणिता सुभाष दिसणार आहेत.

फरदीन खान

ड्रग्जच्या एका प्रकरणात अडकल्यानंतर बॉलिवूड सोडून गेलेला फरदीन खान लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कास्टिंग डायरेक्टर आणि दिल बेचारा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारे मुकेश छाबरा यांनी अलीकडेच फरदीनच्या कमबॅकच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फरदीन शेवटचा 2010 मध्ये रिलीज झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात दिसला होता. आता 11 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

आमिर खान

2018 मध्ये 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या मल्टीस्टारर चित्रपटात झळकलेला आमिर खान गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होता. शेवटच्या चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खान 2020 मध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार होता. परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. मागील वर्षी मार्चमध्ये चंदिगडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली होती. त्यानंतर शूटिंग अर्ध्यावर थांबवण्यात आले होते. आता चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. हा चित्रपट आता यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'लाल सिंह चड्ढा' व्यतिरिक्त आमिर 'मुगल' या चित्रपटावरही काम करत आहे.

भाग्यश्री​​​​​​​​​​​​​​

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्री यावर्षी मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. अभिनेत्री कंगना रनोट स्टारर तामिळनाडूच्या माजी सीएम जयललिता यांच्या बायोपिकमध्ये भाग्यश्री महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण शूटिंग पूर्ण न झाल्यास तो पुढे ढकलण्यात आला होता. आता चित्रपट पूर्ण झाला असून तो यावर्षी प्रदर्शित केला जाईल.

सलमान खान

2019 साली कतरिना कैफसोबत 'भारत' चित्रपटात दिसलेला सलमान खान यावर्षी 'राधे' या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु साथीच्या आजारामुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरुन सतत चांगल्या ऑफर येत होत्या, पण निर्मात्यांना तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचा होता. मात्र आता सलमानने हा चित्रपट झी स्टुडिओजला विकला असल्याची बातमी आहे. यासोबत सलमान 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटातही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने आपल्या आगामी 'अंतिम' या चित्रपटातील फर्स्ट लूकदेखील रिव्हील केला असून यात तो सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. 2021 मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

प्रियांका चोप्रा​​​​​​​​​​​​​​

2019 च्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटानंतर प्रियांका चोप्रा 'द व्हाइट टायगर' आणि 'क्वांटिको'च्या पुढील सीझनमध्ये दिसणार आहे. यासह प्रियांका कल्पना चावलावर आधारित बायोपिकमध्येही कल्पनाची भूमिका साकारू शकते. अद्याप याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही. तिचा 'हीरा मंडी' हा चित्रपटही 2021 मध्ये रिलीज होऊ शकतो.

जॉन अब्राहम​​​​​​​​​​​​​​

2019 मध्ये 'पागलपंती', 'बाटला हाऊस', 'सत्यमेव जयते' या चित्रपटात दिसणारा जॉन अब्राहम 2020 मध्ये एक, दोन नव्हे तर पाच चित्रपटात दिसणार होता. पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. त्याच्या 'सत्यमेव जयते 2' चे शूटिंग सुरु असून तो 2021 मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय जॉन 'मुंबई सागा', 'अ‍टॅक', 'सरदार अँड ग्रॅण्डसन' आणि 'पठाण'मध्ये दिसणार आहे.

ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूड दिवा ऐश्वर्या राय बच्चन 2018 मध्ये 'फन्ने खान' या चित्रपटात दिसली होती. आता दोन वर्षानंतर ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या ‘पोनियन सेल्वान’सह 'गुलाब जामुन' आणि 'जॅस्मिन : स्टोरी ऑफ ए लीज्ड वूमन'मध्ये दिसणार आहे.

सोनम कपूर

'द झोया फॅक्टर'च्या दोन वर्षानंतर सोनम कपूर पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. 2021 मध्ये सोनम 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंगही सुरू झाले आहे.

रणबीर कपूर

2018 मध्ये संजय दत्तचा बायोपिक 'संजू'मध्ये झळकल्यानंतर रणबीर कपूर मोठ्या पडद्यापासून दूर आहे. रणबीर गेल्या दोन वर्षांपासून अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात बिझी होता. 2020 मध्ये या चित्रपटातून तो पडद्यावर परतणार होता. परंतु कोरोनामुळे ते होऊ शकले नाही. आता 2021 मध्ये रणबीर 'ब्रह्मास्त्र' शिवाय 'शमशेरा'मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त संदीप रेड्डींच्या 'अॅनिमल' या चित्रपटामध्येही तो दिसणार आहे.

रणवीर सिंह

'गल्ली बॉय' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर मागील दोन वर्षांपासून रणवीर कोणत्याही नवीन चित्रपटात दिसला नाही. 2020 मध्ये रणवीर वर्षाच्या सुरूवातीलाच 1983 च्या वर्ल्डकपवर आधारित '83' हा चित्रपट घेऊन येणार होता, पण लॉकडाऊनमुळे हा चित्रपट पुढे ढकलला गेला. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय रणवीर 'जयेशभाई जोरदार', 'तख्त' आणि 'सर्कस'मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.

नीतू सिंग

नितू सिंग 2013 मध्ये आलेल्या बेशरम या चित्रपटात मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांच्यासोबत दिसल्या होत्या. आता लवकरच त्या चित्रपटात पुनरागमन करत आहेत. यावर्षी प्रदर्शित होत असलेल्या जुग-जुग जियो या चित्रपटात नीतू सिंग या अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहेत. या चित्रपटात प्राजक्ता कोहली आणि मनीष पॉल देखील सहाय्यक भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...