आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध:'शेरशाह', 'उरी'पासून 'बॉर्डर'पर्यंत, या चित्रपटांमध्ये जवळून दाखवण्यात आली आहे दोन देशांमधील युद्धाची परिस्थिती

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट-

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. युक्रेनमधून लोकांचे झपाट्याने स्थलांतर होत आहे. हजारो युक्रेनियन लोक आपली घरे सोडून आश्रय घेण्यासाठी पश्चिम सीमेवरील शेजारील देशांमध्ये पोहोचत आहेत. युद्धामुळे घाबरलेल्या आणि असहाय्य झालेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. या हल्ल्याची छायाचित्रे पाहून लोक याला तिसरे महायुद्ध म्हणत आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही दोन देशांमधील युद्ध आणि युद्धाची परिस्थिती जवळून दाखवण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट-

शेरशाह

2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या शेरशाह या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या दृष्टीकोनातून कारगिल युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. कॅप्टन विक्रम बत्रा, ज्यांचे कोडनेम शेरशाह होते, त्यांनी कारगिल युद्धात आपले प्राण दिले. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम यांची भूमिका साकारली होती. त्याला या भूमिकेसाठी नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात कियारा अडवाणीने विक्रमच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूप हिट ठरला होता, ज्यासाठी मुख्य कलाकारांना देखील खूप प्रशंसा मिळाली.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक

विकी कौशल, यामी गौतम स्टारर उरी: द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट 2016 मध्ये पाकिस्तानने उरी कॅम्पवर केलेल्या हल्ल्याची कथा आहे ज्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारताने विहान सिंह शेरगिल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केला होता. विहानची भूमिका विकी कौशलने साकारली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्याच्या एक महिना आधी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हाऊज द जोश या चित्रपटातील डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे.

लक्ष्य

2004 मध्ये रिलीज झालेला लक्ष्य हा चित्रपट करण शेरगिल या एका तरुणाची मुलाची कथा आहे ज्याचे आयुष्यात कोणतेही ध्येय नव्हते. कुटुंबाच्या दबावामुळे करण सैन्यात भरती होतो, पण प्रशिक्षण, कायदे आणि मेहनतीला कंटाळून तो पळून जातो. आपल्या कुटुंबाची आणि मैत्रिणीची नाराजी दूर करण्यासाठी करण पुन्हा आर्मी ट्रेनिंगमध्ये परततो आणि लेफ्टनंट बनतो. ही एक काल्पनिक कथा आहे ज्यामध्ये करण कारगिल युद्धात त्याच्या टीमचे नेतृत्व करतो.

केसरी

2019 चा केसरी हा चित्रपट सारागडीच्या लढाईच्या सत्य घटनेवर आधारित आहे, जिथे ब्रिटिश भारतीय सैन्याच्या फक्त 21 शीख सैनिकांनी 10,000 आफ्रिदी आणि ओरकझाई पश्तून आदिवासींशी लढा दिला. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होते.

भुज : द प्राइड ऑफ नेशन

ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर आलेला भुज द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट 1971 मधील भारत-पाक युद्धाच्या सत्य घटनेवर आधारित आहे. युद्धादरम्यान, आयएएफ अधिकारी विजय कर्णिक यांनी आपत्कालीन परिस्थितीत 300 गावातील महिलांच्या मदतीने धावपट्टी तयार केली होती. रातोरात बांधलेल्या या धावपट्टीने त्यांनी इतिहास रचला.

टँगो चार्ली​​​​​​​​​​​​​​

2005 मध्ये आलेला टँगो चार्ली चंद हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानमधील वादामुळे कारगिलला पाठवलेल्या बीएसएफ जवानांची कथा आहे. युद्धाच्या वातावरणात संपूर्ण बटालियनला खूप संघर्ष करावा लागतो.

बॉर्डर​​​​​​​​​​​​​​

1997 मध्ये रिलीज झालेला बॉर्डर हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता, जो 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होता. हा चित्रपट लोंगेवाला युद्धावर प्रकाश टाकतो. राजस्थानमधील लोंगेवाला पोस्टवर 120 शूर भारतीय सैनिक रात्रभर पाकिस्तानच्या टँक रेजिमेंटचा कसा सामना करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

LOC कारगिल​​​​​​​​​​​​​​

अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी स्टारर LOC कारगिल हा चित्रपट भारतीय सैन्याच्या यशस्वी ऑपरेशन विजयची कहाणी आहे, जे 1999 सुरु झाले होते. कारगिलवर पाकिस्तानचा ताबा रोखण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आली होती.

एअरलिफ्ट​​​​​​​​​​​​​​

2016 मध्ये रिलीज झालेला एअरलिफ्ट हा चित्रपट कुवेत इराक युद्धात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याची कथा आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने रणजीतची भूमिका साकारली होती, ज्याने आपला जीव धोक्यात घालून अनेक भारतीयांना सुखरूप भारतात पोहोचवले होते.

बातम्या आणखी आहेत...