आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीम डेब्यूनंतरही दिसली नाही कमाल:स्नेहा उल्लालपासून डेजी शाहपर्यंत सलमान खान लाँच केल्यानंतरही बॉलिवूडमध्ये फ्लॉप राहिले या अभिनेत्रींचे करिअर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्नेहाचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.

बॉलिवूड अभिनेत्री स्नेहा उल्लाल 18 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. स्नेहाला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 2005 मध्ये आलेल्या 'लकीः नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटात स्नेहाने सलमानसोबत काम केले होते.

सलमानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या ऐश्वर्या रायसारखी हुबेहुब दिसत असल्याने स्नेहा बरीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र सलमानने लाँच केल्यानंतरही स्नेहाचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.

स्नेहाप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना सलमानने लाँच केले होते, परंतु असे असूनही त्यांना करिअरमध्ये फारशी कमाल दाखवता आली नाही. अशाच काही अभिनेत्रींवर एक नजर टाकुया…

जरीन खान

झरीन चित्रपटांपेक्षा सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ सारखी दिसते म्हणून चर्चेत असते. 2010 मध्ये सलमानने तिला 'वीर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते, जो फ्लॉप ठरला. यानंतर झरीन 'हाऊसफुल 2', 'हेट स्टोरी 3' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली, पण हे चित्रपट फ्लॉप ठरले.

डेझी शाह

'दबंग' चित्रपटात सलमानची बॅक डान्सर म्हणून काम करणार्‍या डेझी शाहला सलमानने 'जय हो' चित्रपटातून लाँच केले होते. या चित्रपटाद्वारे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती, परंतु त्यानंतर डेझीला बॉलिवूडमध्ये विशेष स्थान मिळाले नाही. डेझी 'हेट स्टोरी 3' आणि 'रेस 3' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती पण सध्या तिच्याकडे प्रोजेक्ट नाही.

अथिया शेट्टी

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला सलमानने 2015 मध्ये 'हिरो' चित्रपटाद्वारे लाँच केले होते. हा चित्रपट फ्लॉप होता आणि अथियाची दखलही घेतली गेली नव्हती. यानंतर अथिया 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सारख्या फ्लॉप चित्रपटात काम केले आहे.

प्रनूतन बहल

2019 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'नोटबुक' या चित्रपटातून प्रनूतने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपट फ्लॉप ठरला होता. प्रनूतन सध्या 'हेलमेट' आणि 'फिर हसेंगे: विभास' या दोन चित्रपटात काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...