आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांमध्ये केवळ शोपीस बनल्या अभिनेत्री:'शमशेरा'मधील वाणी कपूर ते RRRमधील आलियापर्यंत, अभिनेत्रींनी दिला ग्लॅमरचा तडका

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शमशेरा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नसला तरी चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात वाणी कपूर ही देखील झळकली. पण वाणी चित्रपटात केवळ शो पीस म्हणून झळकली असे अनेकांचे म्हणणे आहे. अनेक चित्रपटांमध्ये ग्लॅमरसाठी अभिनेत्रींचा वापर केल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. आज अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया जेव्हा मोठ्या अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये केवळ ग्लॅमरचा तडका दिला.

'शमशेरा'मध्ये वाणी कपूर

या चित्रपटातील रणबीर कपूर आणि संजय दत्त यांच्या अभिनयाचे कौतुक झाले, मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटातील वाणी कपूरच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांच्या मते, या चित्रपटात वाणी कपूरची गरज नव्हती, फक्त ग्लॅमरसाठी तिचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल वाणी खूप खूश होती, परंतु असे असूनही, या चित्रपटात तिची गरज नसल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

'बाहुबली'मध्ये तमन्ना भाटिया

बाहुबली चित्रपटात तमन्ना भाटियाच्या उपस्थितीबाबतही असेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. लोकांच्या मते, तिची उपस्थिती केवळ ग्लॅमरचा तडका होती आणि बाहुबलीच्या यशात तमन्नाची भूमिका नव्हती.

'कोल्डप्ले' म्युझिकमध्ये सोनम कपूर

कोल्डप्लेच्या म्युझिकमध्ये सोनम फक्त एका शॉटमध्ये दिसली होती. यामुळे तिच्या चाहत्यांची खूप निराशा झाली होती. या म्युझिक व्हिडिओमध्ये सोनम केवळ काही सेकंदांसाठी दिसली होती. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना सोनम म्हणाली होती की, या व्हिडिओमध्ये दिसणे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

'RRR' मध्ये आलिया भट्ट

आरआरआरमध्ये आलिया भट्टचा गेस्ट अपिअरन्स लोकांना खूप खटकला होता. चित्रपटातील आलियाची छोटी भूमिका आणि पडद्यावरील कमी वावर यावर लोकांनी टीका केली होती. या बिग बजेट चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाची भूमिकेला खूप प्रमोट केले गेले होते. दाक्षिणात्य डिझायनर आणि ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टीसह अनेक चाहत्यांनी अभिनेत्रीला प्रॉप म्हटले होते. आलिया या भूमिकेमुळे खूप खूश होती आणि तिने या चित्रपटात तिला कास्ट केल्याबद्दल एसएस राजामौली यांचे आभार मानले होते.

बातम्या आणखी आहेत...