आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रींचे पदार्पण:वाणी कपूरपासून ते सारा अली खानपर्यंत, या बॉलिवूड अभिनेत्रींनी सुशांत सिंह राजपूतसोबत केला होता डेब्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतची ऑन स्क्रिन जोडी अनेक नवीन अभिनेत्रींसोबत जमली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची 21 जानेवारी रोजी पहिली बर्थ अॅनिव्हर्सरी होती. तो हयात असता तर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असती. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आठवणीत चाहते भावूक झालेले बघायला मिळाले. सोशल मीडियावर चाहत्यांनी सुशांतचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन त्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुशांतने काय पो छे (2013) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटात काम केले.

सुशांतने आपल्या करिअरमध्ये ब्योमकेश बक्षी, एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी, सोनचिरैया, राब्ता, ड्राइव्ह या चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला होता. यादरम्यान सुशांतची जोडी अनेक नवीन अभिनेत्रींसोबत जमली होती. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात सुशांतबरोबर केली.

वाणी कपूर

वाणीने शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यात तिची जोडी सुशांतसोबत जमली होती. दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले होते. 2013 मध्ये रिलीज झालेला सुशांतचा हा दुसरा चित्रपट होता.

या चित्रपटानंतर वाणीचे करिअर ठीकठाक राहिले. ती बेफिक्रे, वॉरसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.

दिशा पाटनी

दिशाने सुशांतबरोबर ज्या चित्रपटातून डेब्यू केले होते तो चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट मानला जात होता. दिशा एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांतच्या अपोझिट दिसली होती. चित्रपटात सुशांतने एमएस धोनीची भूमिका साकारली होती, तर दिशा त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत होती.

सारा अली खान

2018 मध्ये साराने सुशांतच्या अपोझिट केदारनाथ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलाची प्रेमकथा दाखवण्यात आली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही, मात्र सारा आणि सुशांतची बाँडिंग वाढली होती. या चित्रपटानंतर हे दोघे काही काळ रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले गेले होते.

संजना सांघी

संजनाने सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘दिल बेचारा’तून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुशांतच्या निधनानंतर हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामुळे या चित्रपटाला सुशांतच्या चाहत्यांची सहानुभूती मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...