आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनयापूर्वी...:वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रापासून ते रणबीर कपूरपर्यंत, बिहाइंड द कॅमेरा काम करुन बनले बॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनयापूर्वी काय करायचे बॉलिवूडचे लोकप्रिय कलाकार...

बॉलिवूडमधील अनेक सर्वोत्कृष्ट कलाकारांनी चित्रपटांत झळकण्यापूर्वी कधी सहाय्यक दिग्दर्शक तर कधी डिझायनर म्हणून काम केले आहे. चला जाणून घेऊया ते सेलिब्रिटी कोण आहेत -

भूमी पेडणेकर
‘दम लगाके हइशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या भूमी पेडणेकरने यशराज प्रॉडक्शन हाऊसमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून 6 वर्ष काम केले आहे. कॅमेर्‍याच्या मागे काम करणारी अभिनेत्री आता इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. अलीकडेच तिचा दुर्गामती हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

2012 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या सिद्धार्थ मल्होत्राने मॉडेलिंगद्वारे आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. माय नेम इज खान या चित्रपटात त्याने दिग्दर्शक करण जोहरला असिस्ट केले होते. काही वर्षांनंतर, करण जोहरने त्याला इंडस्ट्रीमध्ये लाँच केले.

वरुण धवन

सिद्धार्थ मल्होत्रासोबतच करण जोहरने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे वरुण धवनला देखील लाँच केले होते. वरुण धवनने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर त्याने करण जोहरबरोबर माय नेम इज खान या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

रणबीर कपूर

ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने चित्रपटतसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटण्यापूर्वी कॅमेर्‍याच्या मागे काम केले आहे. ऋषी कपूर दिग्दर्शित 1999 च्या ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात रणबीरने त्याच्या वडिलांना असिस्ट केले होते. ऐश्वर्या राय त्यावेळी रणबीरची आवडती अभिनेत्री असायची. कॅमेर्‍याच्या मागे काम करत असताना एकेदिवशी पडद्यावर ऐश्वर्यासोबत रोमान्स करायला मिळेल, हे कदाचित त्यावेळी रणबीरलादेखील माहित नसावे. 2016मध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.

सोनम कपूर

इंडस्ट्रीची सर्वात स्टाइलिश अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोनम कपूरला कधीही अभिनयात रस नव्हता. शिक्षण संपल्यानंतर जेव्हा ती परदेशातून परत आली तेव्हा वडील अनिल कपूर यांच्या सांगण्यावरून तिला संजय लीला भन्साळींना असिस्ट करण्याची संधी मिळाली. या अभिनेत्रीने ब्लॅक चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भन्साळींनी सोनमला वजन कमी करण्यास सांगितले आणि नंतर त्यांनी 'सावारियां' चित्रपटाद्वारे तिला इंडस्ट्रीत लाँच केले होते.

अर्जुन कपूर

इश्कजादे या चित्रपटाद्वारे प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्जुन कपूरने अभिनय कारकीर्दीला सुरुवात करण्यापूर्वी सलाम-ए-इश्क आणि कल हो ना हो सारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय अर्जुन वडील बोनी कपूर यांच्या नो एन्ट्री आणि वाँटेड यासारख्या चित्रपटाचा सहाय्यक निर्माताही होता.

विक्की कौशल

विक्की कौशलचे वडील श्याम कौशल एक स्टंटमॅन आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत. अनेक नोक-यांमधून रिजेक्ट झाल्यानंतर विक्कीने वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर जाण्यास सुरुवात केली. शूटिंगचा अनुभव घेतल्यानंतर विक्कीने अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुर या ब्लॉकबस्टर फिल्ममध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर त्याला मसान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यानंतर विक्की आता नॅशनल क्रश झाला आहे.

परिणीती चोप्रा

इश्कजादे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेल्या परिणीती चोप्राचे बिझनेस, इकॉनॉमिक्स आणि फायनान्ससह 3 ऑनर्स डिग्री घेतल्या आहेत. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने यशराज प्रॉडक्शनसाठी पीआर टीम म्हणून काम केले. इथेच तिला इश्कजादे या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.

हर्षवर्धन कपूर

सोनम कपूरचा भाऊ आणि अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांनी बॉम्बे वाल्वेट या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने मिर्जया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

बातम्या आणखी आहेत...