आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरचा निरोप:संगीतकार वाजिद खान सुपुर्द-ए-खाक, भावाने पाणावलेल्या डोळ्यांनी दिला अखेरचा निरोप; पत्नी आणि मुलेही दिसली 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास वाजिद यांची प्राणज्योत मालवली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा भाऊ साजिद खान आणि इतर जवळच्या मित्रांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. वाजिद यांची पत्नीही त्यांच्या दोन्ही मुलांसह स्मशानभूमीच्या बाहेर दिसली. रविवारी रात्री वाजिद यांचे निधन झाले होते.

दिव्य मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, 42 वर्षीय वाजिद यांना आठवड्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि गेल्या तीन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. कोरोनामुळे त्यांना मल्टीऑर्गन फेल्युअर झाल्याचे म्हटले जाते. ते ब-याच काळापासून किडनीच्या समस्येने त्रस्त होते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर झाली होती.

वाजिद यांचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे स्मशानभूमीत आणण्यात आले.  कोविड -19 च्या निर्बंध आणि भीतीमुळे स्मशानभूमीत पोहोचलेल्या लोकांची संख्या खूप कमी होती. यावेळी काही पोलिसही तेथे हजर होते.

वाजिद यांची पत्नीही मुलांसह स्मशानभूमीच्या बाहेर दिसली. त्यांनी हात जोडून यावेळी अभिवादन केले. 

सलमान खानला साजिद-वाजिद या जोडीचा गॉडफादर म्हटले जाते. या जोडीने 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान स्टारर प्यार किया तो डरना क्या द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटाच्या संगीताचे श्रेय हिमेश रेशमिया आणि जतिन-ललित यांना जाते, पण अरबाज खानवर चित्रित  झालेले 'तेरी जवानी' हे गाणे साजिद-वाजिद यांनी तयार केले होते. या चित्रपटादरम्यान सलमानबरोबर दोघांची चांगली बॉडिंग निर्माण झाली. त्यानंतर या जोडीने बॅक टू बॅक सलमानच्या अनेक चित्रपटांची गाणी संगीतबद्ध केली. हॅलो ब्रदर (1999,)), तुमको ना भूल पाएंगे(2002), तेरे नाम(2003), मुझसे शादी करोगे(2004), गर्व(2004), पार्टनर(2007), वाँटेड(2009), दबंग (2010),दबंग 2(2012), एक था टायगर (2012), दबंग 3 (2019) या ब्लॉकबस्टर चित्रपटांचा यात समावेश आहे.  

  सलमान खानचे मॅनेजर जॉर्डी पटेल यांच्या म्हणण्यानुसार, वाजिद मूत्रपिंडाच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, त्याच दरम्यान त्यांना कोविडची 19 ची लागण झाली. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी झाली होती. अशा परिस्थितीत कोरोना विषाणू त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचला.

अभिनेता आदित्य पंचोलीही वाजिदला अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीवर पोहोचला. मानव मंगलानी आणि विरल भयानी यांनी यासंबंधितचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

वाजिद यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आणि अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. वाजिद खान यांच्या निधनामुळे खरंच धक्का बसला आहे. एक हसमुख व्यक्तीमत्त्व आज आपल्याला सोडून गेलं, असे ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...