आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या अक्षय कुमार त्याचा आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीदरम्यान, अक्षयने सांगितले की तो कधीही कामाला नाही म्हणत नाही. मग तो एखादा चित्रपट असो किंवा कार्यक्रम किंवा जाहिरात. पैसे मिळवण्यासाठी तो कोणतेही काम करु शकतो, असे अक्षयने सांगितले. सोबतच कमावलेला पैसा समाजासाठी चांगल्या कामात वापरायचा आहे, असेही त्याने सांगितले.
काम, कमाई आणि कर्म - अक्षय
अक्षय म्हणाला, "लोक मला विचारतात की तू एका वर्षात इतके चित्रपट का करतोस? पण मी माझ्या आयुष्यात तीन गोष्टी शिकलो आहे - काम, कमाई आणि कर्म. मी जितके जास्त पैसे कमावता येईल त्यासाठी शक्य तितके कष्ट करतो. माझ्याकडे कोणतेही काम आले तरी मी कधीही नकार देत नाही. भूमिका कोणतीही असो, कोणतेही फंक्शन असो, कोणत्याही वस्तूची जाहिरात असो, मी कधीही नकार देत नाही," असे अक्षयने सांगतो.
मी माझ्या कमाईतून चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो
अक्षय पुढे म्हणाला, "पैसा कामातून येतो आणि त्यातून चांगली कामे करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही जितके जास्त काम कराल तितके तुम्ही कमावता आणि त्यापेक्षा जास्त तुम्ही समाजाला परत देता. यात काही गैर आहे असे मला वाटत नाही," असे अक्षय म्हणाला.
11 ऑगस्टला रिलीज होणार आहे 'रक्षा बंधन'
अक्षय त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हिमांशू शर्मा आणि कनिका धिल्लन यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
अक्षय कुमारचे आगामी चित्रपट
अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे 'सेल्फी' हा चित्रपट आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त इमरान हाश्मी, डायना पेंटी आणि नुसरत भरुचा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अक्षय राधिका मदनसोबत 'सूराराई पोटरु'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.