आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन:सलग दुस-या दिवशी चौकसीसाठी NCB च्या ऑफिसमध्ये पोहोचली अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, उद्या अभिनेत्याची होऊ शकते चौकशी

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गॅब्रिएला डेमेट्रियड्स आपल्या वकिलासह एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली.

अभिनेता अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सची नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी चौकशी करत आहे. ग्रॅबिएला एनसीबीच्या ऑफिसमध्ये दाखल झाली आहे. तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनसीबी शुक्रवारी अर्जुन रामपालची चौकशी करणार असल्याचे समजते. गुरुवारी एनसीबीच्या ऑफिसमध्ये जाताना ग्रॅबिएला अर्जुनसोबत घराबाहेर पडली. मात्र एनसीबीच्या ऑफिसमध्ये ती एकटीच आली. सध्या एनसीबीच्या अधिका-यांकडून तिची चौकशी सुरु आहे.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितल्यानुसार, ग्रॅबिएला हिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. कारण तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक पुरावा मिळाल्यानंतर एक टीम गॅब्रिएलापर्यंत पोहोचली.

यापूर्वी बुधवारी सकाळी 11 वाजता गॅब्रिएलाला एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले होते, परंतु ती दुपारी 12.30 च्या सुमारास एनसीबी कार्यालयात पोहोचली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत तिची चौकशी करण्यात आली. तिच्याकडून एनसीबीला समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे तिला गुरुवारी पुन्हा बोलावण्यात आले आहे. एनसीबीच्या हाती इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे रिपोर्ट आले आहेत, ते बघता गॅब्रिएलाला पुन्हा प्रश्न विचारले जातील.

घराबाहेर पडताना अर्जुन रामपाल देखील ग्रॅबिएलासोबत होता.
घराबाहेर पडताना अर्जुन रामपाल देखील ग्रॅबिएलासोबत होता.

छापा टाकून बंदी घालण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली
एनसीबीने 9 नोव्हेंबर रोजी अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकला होता. या धाडीदरम्यान त्याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि अवैध, बंदी घालण्यात आलेली औषधे जप्त करण्यात आली होती. याशिवाय अनेक कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली. जवळजवळ सात ते आठ तास हे धाडसत्र सुरु होते. तपास यंत्रणेने यावेळी त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे.

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनचा मेहुणा (ग्रॅबिएलाचा भाऊ) अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅबलेट मिळाल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळ्यातून अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान एनसीबीला काही मोठे पुरावे मिळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. आता अ‍ॅगिसिलोस जामीन मंजुर झाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे.

दिव्य मराठीने 1 ऑक्टोबर रोजी अर्जुन रामपालच्या ड्रग्ज कनेक्शनविषयीची बातमी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...