आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा बहुप्रतिक्षित 'गदर 2' यावर्षी प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गदर : एक प्रेमकथा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. दरम्यान 'गदर 2'च्या शूटिंग सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. यात सनी देओल फूल अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.
'गदर 2'च्या सेटवरुन व्हायरल झालेल्या व्हिडिओत सनी म्हणजेच तारा सिंग आणि अभिनेत्री सिमरत कौर दोन सिमेंटच्या खांबांना बांधलेले दिसत आहेत. त्यांच्यासह बाजूला पोलिस बंदूक घेऊन उभे आहेत. अशातच सनीचा राग अनावर होतो आणि त्याला ज्या खांबाला बांधलेला आहे तो खांब उखडतो. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर असलेल्या नायिकेलाही वाचवतो. यावेळी सनीने पठाणी सूट आणि डोक्यावर पगडी असा पोशाख परिधान केलेला दिसत आहे.
यापूर्वीही दिसली होती सनी देओलची झलक
या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून या चित्रपटातील सनीची पहिली झलक काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ‘झी स्टुडिओज’च्या एका व्हिडिओमध्ये तो बैलगाडीचा चाक उचलताना दिसला होता. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो हातात मोठा हातोडा घेऊन उभा दिसला.
पुन्हा प्रदर्शित होणार आहे 'गदर: एक प्रेम कथा'
'गदर'च्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी एक अधिकृत निवेदन शेअर करत 'गदर' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करत असल्याचे सांगितले होते. 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा दुसरा भाग 'गदर 2' हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मिती कंपनीने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले, "गदर: एक प्रेम कथा हा चित्रपट 'गदर 2' च्या आधी प्रदर्शित होईल. 2001 मध्ये ज्या तारखेला रिलीज झाला होता त्याच तारखेला तो रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची संपूर्ण कथा पुन्हा एकदा समजावी यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी 15 जून 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे
या दिवशी रिलीज होणार 'गदर 2'
'गदर 2' या चित्रपटाचे पोस्टर 26 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यंदाही मुख्य भूमिकांमध्ये तेच कलाकार दिसणार आहेत. मात्र अशरफ अली (अमरीश पुरी यांनी ही भूमिका साकारली होती) सह काही पात्र या भागात दिसणार नाहीत. चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेलसह सिमरत कौर, लव सिन्ह आणि मनीष वाधवा झळकणार आहेत.
'गदर'ने केली होती 250 कोटींची कमाई
'गदर' हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल 250 कोटींची कमाई केली होती. 'गदर'मध्ये तारा आणि सकिना (अमिषा पटेल) यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. 'गदर 2' मध्ये तारा आणि सकिनासोबत त्यांचा मुलगा जीत याचीही कथा दाखवली जाईल, असा अंदाज आहे. पहिल्या भागात तारा त्याची पत्नी सकिनाला आणण्यासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. आता दुसऱ्या भागात काय कथानक असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 'गदर 2'चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांचे आहे. चित्रपटाच्या सिक्वेलवर मागील 15 वर्षांपासून काम सुरू आहे.
'गदर' बघण्यासाठी थिएटरबाहेर लागल्या होत्या प्रेक्षकांच्या रांगा
सनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यातलाच 'गदर' हा सनी यांचा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की, प्रेक्षकांच्या मागणीवरुन सकाळी 6 वाजल्यापासूनच चित्रपटगृहे सुरू झाली. एका दिवसात चित्रपटाचे सुमारे 8 शो चालायचे. असे असूनही सुमारे 5 हजार लोक थिएटरच्या बाहेर रांगेत उभे होते. परिस्थिती अशी होती की, हा चित्रपट पाहण्यासाठी लोक ट्रकमधून यायचे आणि अनेक वेळा तिकीट न मिळाल्याने लोकांनी गोंधळ घातला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.