आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गदर 2'मधील सनी देओलचा फर्स्ट लूक रिव्हील:हातात बैलगाडीचे चाक आणि शत्रूंशी सामना दिसला तारा सिंग, 22 वर्षांनंतर येतोय सिक्वेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल लवकरच 'गदर 2' या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहेत. चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान झी स्टुडिओजकडून एक टिझर शेअर करण्यात आला. ज्यात गदर 2मधील सनी देओलची एक छोटीशी झलक लक्ष वेधून घेतेय. 'गदर' या चित्रपटात सनी देओल हँडपंप उखडून काढताना दिसले होते. आता 'गदर 2'च्या समोर आलेल्या व्हिडिओनुसार ते यामध्ये बैलगाडीचे चाक हवेत उचलून धरताना दिसत आहेत. 'गदर 2' हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कहानी' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. झी स्टुडिओजने अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केलेले नाही.

'गदर 2'मधील सनीचा लूक चाहत्यांना आवडला

झी स्टुडिओजने यावर्षीच त्यांच्या बॅनरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटांचा एक 50 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला, ज्यात सनी देओलची एक छोटीशी झलक पाहायला मिळाली. या व्हिडिओत अजय देवगणच्या 'मैदान', सलमान खानच्या 'भाईजान', सोनू सूदच्या 'फतेह' आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी', सुबोध भावेच्या 'वाळवी' या चित्रपटांची झलक बघायला मिळाली. याच व्हिडिओत 'गदर 2'मध्ये तारा सिंगची भूमिका वठवणा-या सनी देओल यांचीही झलक लक्ष वेधून घेतेय. सनी देओलला तारा सिंगच्या अवतारात पाहून चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. जो टिझर शेअर करण्यात आला होता, त्यामध्ये सनी 'तारा'च्या रुपात दिसत असून त्यांच्या हातात बैलगाडीचे चाक आहे आणि ते शत्रूंशी सामना करताना दिसत आहेत. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणे सुपरहिट होईल, अशी आशा चाहते व्यक्त करत आहेत.

22 वर्षांनंतर येतोय चित्रपटाचा दुसरा भाग
'गदर' हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल 250 कोटींची कमाई केली होती. गदरमध्ये तारा आणि सकिना (अमिषा पटेल) यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. 'गदर 2' मध्ये तारा आणि सकिनासोबत त्यांचा मुलगा जीत याचीही कथा दाखवली जाईल, असा अंदाज आहे. पहिल्या भागात तारा त्याची पत्नी सकिनाला आणण्यासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. आता दुसऱ्या भागात काय कथानक असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 'गदर 2'चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांचे आहे.
'गदर' बघण्यासाठी थिएटरबाहेर लागल्या होत्या प्रेक्षकांच्या रांगा
सनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यातलाच 'गदर' हा सनी यांचा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की, प्रेक्षकांच्या मागणीवरुन सकाळी 6 वाजल्यापासूनच चित्रपटगृहे सुरू झाली. एका दिवसात चित्रपटाचे सुमारे 8 शो चालायचे. असे असूनही सुमारे 5 हजार लोक थिएटरच्या बाहेर रांगेत उभे होते. परिस्थिती अशी होती की, हा चित्रपट पाहण्यासाठी लोक ट्रकमधून यायचे आणि अनेक वेळा तिकीट न मिळाल्याने लोकांनी गोंधळ घातला होता.

बातम्या आणखी आहेत...