आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Galwan Valley Face Off: Amitabh Bachchan, Akshay Kumar, Hrithik Roshan And Other Celebs Send Their Deepest Condolences To The Martyrs' Families

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलवान खोऱ्यात संघर्ष:अक्षय, अजय, हृतिक, सोनाक्षीसह अनेक कलाकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली, अमिताभ म्हणाले - जरा आँख में भर लो पानी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारत-चीन सीमेवर मागील 42 दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाने रक्तरंजित रूप घेतले. भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेऊन ठाण मांडून बसलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला. एएनआयच्या वृत्तानुसार त्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत.  या घटनेनंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली असून कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, तमन्ना भाटिया, सोनाक्षी सिन्हा यासह अनेक कलाकारांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून जवानांना आदरांजली वाहिली आहे. ‘जरा आँख में भर लो पानी; जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी.’ या जवानांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले. 

अक्षय कुमार म्हणाला - आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू 

अक्षय कुमारने लिहिले -  गलवान खोऱ्यात झालेल्या आमच्या शूरांच्या मृत्यूमुळे मनापासून दु:ख झाले. देशाची अनमोल सेवा केल्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमी ऋणी आहोत. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.'

अजय देवगणनेही वाहिली श्रद्धांजली 

अजय देवगणने लिहिले, 'भारताच्या सीमेचे आणि सन्मानाचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या प्रत्येक सैनिकाला सलाम. जय जवान, जय भारत, शूरांना आदरांजली. माझ्या भावना या क्षणी तुमच्या कुटुंबियांसमवेत आहेत. #गालवान व्हॅली#भारतीय सेना'

हृतिक म्हणाला - माझे मन सून्न झाले 

हृतिक रोशनने लिहिले की, 'मला लडाखमध्ये झालेले मृत्यू आणि तिथे असलेल्या अशांततेविषयी कळताच माझे मन सून्न झाले. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्यांना माझा सर्वोच्च सन्मान. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन आणि प्रार्थना. दिवंगत व जीवित लोकांना शांती मिळो.'

अनुपम खेर यांनी लिहिले, भारतीय सेना की जय। जय हिन्द।

गायिका पलक मुछालने लिहिले, 'जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी' 

सोनू सूदने केले संतोष बाबूंचे स्मरण

सोनूने लिहिले, 'संतोष बाबू .. तुम्ही नेहमी आमच्या हृदयात राहाल. तुमचे बलिदान कधीही विसरणार नाही. तुम्ही देशासाठी जे काही केले त्याबद्दल आम्ही तुम्हाला व तुमच्या कुटूंबाला अभिवादन करतो.'

तमन्नाला वाटतेय कुटुंबीयांची चिंता

अभिनेत्री तमन्ना भाटियाने ट्विट केले की, 'आमच्यासाठी अथक लढा देऊन आपला जीव गमावलेल्या जवानांच्या कुटुंबियांबद्दल माझे हृदय पिळवटून निघत आहे. ओम शांती.'

सोनाक्षी सिन्हाने लिहिले, आम्ही कायम ऋणी राहू  

सोनाक्षी सिन्हाने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, 'आमच्यासाठी आपले जीवन धोक्यात घालणा-या सर्वांसाठी आम्ही कायम ऋणी राहू. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अत्यंत आदरपूर्वक संवेदना. #कधीच विसरणार नाही'

अदनान सामींनी दिली शहिदांना श्रद्धांजली 

महेश भट्ट यांनी श्रद्धांजली देताना लिहिले, 'ऐ मेरे वतन के लोगों  जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी...'

बातम्या आणखी आहेत...