आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Gandhinagar FSL Recovers Data From 30 Of More Than 80 IPhones Of Drug Peddlers, Including Deepika Padukone, Sara And Shraddha, Two Harddisks Filled

बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन अनलॉक:गांधीनगर FSL ने दीपिका पदुकोण, सारा आणि श्रद्धा यांच्यासह ड्रग पेडलर्सच्या 80 हून अधिक आयफोनमधून 30 चा डेटा रिकव्हर केला

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गांधीनगर FSL ने व्हॉट्स अॅप, कॉल चॅट, व्हिडिओ क्लिप्ससह दोन वर्षांचा डेटा एनसीबीकडे सोपवला आहे
  • मोबाइलमधून रिट्रीव्ह केलेल्या डेटाच्या आदारे एनसीबी आता सेलिब्रिटीज आणि ड्रग्ज पेडलर्सविरोधात कारवाई करणार

बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) गांधीनगर स्थित फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे डेटा तपासणीची जबाबदारी सोपवली होती. त्यापैकी 30 मोबाइल डेटाचा अंतिम अहवाल एफएसएलने एनसीबीला सादर केला आहे. एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती, अर्जुन रामपाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडसह मुंबईतील अनेक ड्रग पेडलर्सच्या 100 गॅझेटचा डेटा रिट्रीव्ह करुन 2 हार्डडिस्क एफएसएलला दिले होते. यात व्हॉट्स-अॅप चॅट, फोन कॉल, व्हिडिओ क्लिपिंग्सच्या दोन वर्षांच्या डेटाचा समावेश आहे. अन्य 70 गॅझेटची अद्याप चौकशी चालू आहे.

500 एचडी मूव्ही स्टोअरच्या बरोबरीचा आहे डेटा
एफएसएलकडून एकाच वेळी 100 डेटा गॅझेट्सची चौकशी होणारी देशातील ही पहिली घटना आहे. यासाठी एफएसएलला 15 लाख रुपये फी मिळाली आहे. या 30 फोनमधून दोन हार्डडिस्क भरतील एवढा डेटा काढण्यात आला आहे. एफएसएलकडून प्राप्त माहितीनुसार एनसीबीने त्यांना 500 एचडी मूव्ही स्टोअर्स असेल एवढा डेटा सोपवला होता. या डेटामुळे एनसीबीला कोणता ड्रग पेडलर कोणत्या सेलिब्रिटीच्या संपर्कात होता याची माहिती मिळेल.

चीनी फोनवरून डेटा काढण्यासाठी एका खास टूलचा वापर केला
एफएसएलकडून मिळालेल्या माहितीनुसार, या 100 गॅझेटपैकी एक गॅझेट चीनच्या कंपनीचे होते, ज्यावर अमेरिकेत बंदी आहे. या फोनवरून डेटा काढणे बरेच अवघड होते. यासाठी एक खास टूल विकसित केले गेले आणि ते वापरले गेले. त्याचा सर्व डेटा रिट्रीव्ह करुन तो एनसीबीकडे देण्यात आला आहे.

अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेंड आणि मेहुण्याचे 10 हून अधिक फोन
30 फोन डेटापैकी 10 फोन अर्जुन रामपाल, त्याची मैत्रीण आणि मैत्रिणीचा भावाचे आहेत. हे सर्व फोन एनसीबीने जप्त केले होते. त्याचा डेटाही रिट्रीव्ह करुन एनसीबीकडे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...