आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा चौथा दिवस आहे. अनेक जण तिसरे महायुद्ध होणार असे भाकित देखील करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाविरोधात अनेक बॉलिवूड कलाकार आपला आवाज उठवत आहेत. दरम्यान बॉलिवूडमध्ये काम करत असलेली यूक्रेनियन कलाकार नतालिया कोजेनोवा हिने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, युद्धामूळे माझा मनात खूप भिती आहे. मला माझ्या कुटुंबियांची चिंता होत आहे. पुढे भावूक होत नतालिया म्हणाली की, जर युक्रेन युद्धात माझ्या कुटुंबियांना काही झाले तर, मी अनाथ होईल.
नतालिया कुटुंबियांची चिंता
नतालिया म्हणाली की, "माझे संपूर्ण कुटुंब युक्रेनच्या Rivne या शहरात राहते. माझ्या देशाची युद्धाने अवस्था बिकट झाली आहे. रशियाने माझ्या देशावर अनेक प्रकारचे हल्ले केले आहेत. मी माझ्या आईसोबत फोनवर चर्चा करत असून, परिस्थितीचा आढावा घेत आहे. माझी आई म्हणाली की, रशियाचे सैन्य Rivne शहराजवळ येत आहे."
संपर्क तुटू नये याची नतालियाला भिती
पुढे नतालिया म्हणाली की, "युक्रेनची सैन्य नागरिकांना घरातून निघून बॉम्ब ब्लास्ट शॅल्टर्स (सुरक्षित जागा) मध्ये जाण्याचे आवाहन करत आहेत. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य घरात लपून बसले आहे. त्यामुळे मला संपर्क करण्यास अडथळा जाणवत आहे. कारण, घरात नेटवर्क कमी येत आहे. त्यामुळे मला त्यांची चिंता सतावत आहे." असे नतालिया म्हणाली.
कुटुंबियांनी भारतात यावे-नतालिया
नतालिया पुढे म्हणाली की, "जर माझ्या कुटुंबियांना काही झाले तर, अनाथ होऊन जाईल. त्यांच्याशिवाय मला कोणीही नाही. मला अशी आशा आहे की, भारत युक्रेनला मदत करेल." नतालियाचे असे म्हणणे आहे की, त्याच्या कुटुंबियांनी भारतात यावे. गेल्या काही वर्षापूर्वी नतालिया आपले करिअरच्या शोधत भारतात आली होती. नतालिया 'गंदी बात' या वेब सिरीझमध्ये पाहायला मिळाली होती.
रशिया-युक्रेन युद्धाची परिस्थिती
रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या खार्किव शहरात घुसले आहेत. तर राजधानी कीवमध्ये युक्रेन सैन्य रशियाच्या सैन्याशी लढत आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 198 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला असून त्यात 33 मुलांचा समावेश आहे. याशिवाय 1,115 लोक जखमी झाले आहेत. यूएनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत 1.50 लाखांहून अधिक युक्रेनियन निर्वासित पोलंड, मोल्दोव्हा आणि रोमानियामध्ये पोहोचले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.