आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गँग्स ऑफ वासेपूर' फेम झीशान कादरीवर एफआयआर:हॉटेलचे 29 लाख रुपयांचे बिल थकवले, फसवणुकीचा आरोप

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातील अभिनेता आणि पटकथा लेखक झीशान कादरी पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. रांचीच्या हिंदपिरी पोलिस ठाण्यात झीशानविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. रांचीमधील एका हॉटेलचे चक्क 29 लाख रुपये थकीत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र अद्याप यासर्व प्रकरणावर त्याने कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

हॉटेल मॅनेजरने झीशानविरोधात एफआयआर नोंदवला
हॉटेलच्या मॅनेजरने झीशानविरोधात हा एफआयआर दाखल केला आहे. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2020 मध्ये 'फुर्रे' या वेब सिरीजच्या शूटिंगसाठी झीशानने अनेक खोल्या बुक केल्या होत्या, परंतु त्याने अद्याप पैसे दिलेले नाहीत. झीशान कादरी याचे एकूण बिल 35 लाख रुपयांचे बिल होते, त्यापैकी त्याने फक्त 6 लाख रुपये भरले.

झीशान कादरी आणि अनुराग कश्यप यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
झीशान कादरी आणि अनुराग कश्यप यांनी 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

झीशानवर यापूर्वीही फसवणुकीचा आरोप आहे झीशानवर यापूर्वी मुंबईतील मालाड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शालिनी चौधरी नावाच्या महिलेची तब्ब्ल 26 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप झीशानवर होता. शालिनीचा आरोप होता की, झीशानने फसवणूक करून तिची कार चोरली आणि नंतर ती विकली.

बातम्या आणखी आहेत...