आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाचा स्क्रिन रायटर आणि अभिनेता जीशान कादरीविरोधात बुधवारी मुंबईतील अंबोली पोलिस स्टेशनमध्ये कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा तक्रार दाखल करण्यात आली आहे. फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेनमेंट जीशानची कंपनी आहे. जीशानने 1.5 कोटींची अफरातफर केल्याचा दावा निर्माता जतीन सेठी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. एका वेब सीरिजसाठी जीशानला देण्यात आलेल्या रकमेचा त्याने गैरवापर केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
निर्माते जतिन सेठींनी सांगितले की, जीशान कादरीची कंपनी फ्रायडे टू फ्रायडे एंटरटेनमेंट आणि त्यांची कंपनी नाद फिल्म्स प्रॉडक्शन हाउस यांच्यात एका वेब सीरिजसाठी करार झाला होता. पण जीशानने माझी फसवणूक केली. वेब सीरिजमध्ये पैसे गुंतवतो असे सांगून माझ्याकडून पैसे उकळले आणि खरतर ते पैसे त्याने गुंतवलेच नव्हते. यामुळे मला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
या तक्रारीत जीशान कादरीसह प्रियांका बसी या महिलेच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यांनी सांगितले की, या फसवणुकीमध्ये प्रियांका बसी ही अभिनेत्रीही सहभागी होती. प्रियांका बसी अभिनेत्री आहेच पण ती जीशानसोबत दिग्दर्शनामध्येही सहभागी होती.
जीशान कादरीला लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार
अंबोली पोलिस स्टेशनच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जतीन सेठींनी एका वेब सीरिजसाठी कादरीला दीड कोटी रुपये दिले होते. मात्र कोरोनाव्हायरसमुळे वेब सीरिजचे काम बंद पडले आणि कादरीने ते पैसे दुसरीकडे खर्च केले. जीशानने ठरलेल्या वेळेत पैसे परत केले नाहीत. त्याने जतीन सेठींना जे चेक दिले होते बाउंस झाले. प्राथमिक चौकशीनंतर जीशान कादरीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकरच जीशान कादरीला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. आता या प्रकरणी जीशानला अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
'छलांग' या चित्रपटाचा लेखक आहे जीशान कादरी
जीशान कादरी अलीकडेच 'बिच्छू का खेल' या वेब सीरिजमध्ये झळकला होता. या वेब सीरिजमध्ये त्याने इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत होता. कादरी हा नुकताच रिलीज झालेल्या 'छलांग' या चित्रपटाचा लेखकही आहे. अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या या चित्रपटात राजकुमार राव आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.
'गँग्स ऑफ वासेपूर -2' मध्ये कादरीने साकारली 'डेफिनेट'ची भूमिका
'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटाचा जीशान लेखक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले होते. कादरीने 'गँग्स ऑफ वासेपूर - 2' मध्ये 'डेफिनिट'ची भूमिका देखील केली होती. या भूमिकेतून जीशान खूप लोकप्रिय झाला होता. त्याने 'मेरठिया गँगस्टर' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. जीशान सध्या अनुराग कश्यपसोबत 'गँग्स ऑफ वासेपूर 3' या चित्रपटावर काम करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.