आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगूबाई काठियावाडी:भन्साळींनी आलियाकडून करुन घेतली चांगली मेहनत, 'ढोली डा' गाण्यासाठी करावा लागला महिनाभर सराव,; तरीही गाणे शूट करण्यासाठी लागले 6 दिवस

अमित कर्णएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरबा, कव्वाली आणि 2 प्रेमगीते मिळून चित्रपटात असतील एकूण 5 गाणी

आलिया भट्टने आपल्या आणि शाहरुखच्या बॅनर खाली बनत असलेल्या ‘डार्लिंग्ज’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. काही दिवसांपूवीर्च त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई’चे शूटिंग पूर्ण केले आहे. शेवटच्या सहा दिवसात आलियाने चित्रपटातील काही गाण्यांचे शूटिंग केले, त्यासाठी भन्साळी यांनी तिच्याकडून चांगली मेहनत करुन घेतली. चित्रपटात एकूण 5 गाणी आहेत, त्यातील एक गाणे ‘ढोली डा’, ते जानेवारीमध्ये शूट केले गेले होते. यासाठी भन्साळींनी आलियाकडून महिन्याभर सराव करुन घेतला होता त्यानंतर हे गाणे भन्साळींनी 6 दिवसांत चित्रीत केले.

  • शांतनुसोबत शूट केली दोन प्रेमगीते

या गरबा गाण्याव्यतिरिक्त आलिया आणि मुख्य भूमिकेतील अभिनेता शांतनु माहेश्वरीवरदेखील दोन प्रेम गीते शूट केले गेले आहेत. यातील एक गाणे आधीच चित्रीत केले गेेले होते. दुसरे गाणे नुकतेच चित्रीत झाले. आलिया आणि शांतनुवर हे गाणे चित्रीत झाले आहे. गंगूबाईला एका कमी वयाच्या तरुणांसोबत प्रेम झाले होते त्यामुळे आलियासोबत शांतनु माहेश्वरीला घेण्यात आले आहे, तो कमी वयाचा असून त्या पात्रात फिट बसला आहे.

  • पहिल्यांदाच कमी डान्सर्ससोबत केले शूट

सहसा, भन्साळी आपल्या चित्रपटांची गाणी लॅव्हिश सेटवर पार्श्वभूमी नर्तकांसह मोठ्या संख्येने शूट करतात, परंतु कोरोनामुळे यात एक मोठा बदल झाला. गाण्यांच्या बॅकग्राउंडमध्ये मर्यादित संख्येने नर्तक वापरले गेले आहेत. कव्वाली गाण्याच्या पार्श्वभूमीत फक्त 12 कनिष्ठ नर्तक आहेत. गंगूबाईंचे टायटल साँगदेखील फक्त 24 नर्तकांनी शूट केले होते. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये जेव्हा अशा गाण्यांची गरज पडायची तेव्हा त्याचा सेट तयार असायचा. त्यात 50 ते 100 कलाकार हजर असत.

  • पूर्ण चित्रपटात आलियाला फॅन्सी पोशाख घालू दिला नाही

कोरियोग्राफर्सच्या टीमने ‘ढोली डा’ गाण्यात 11 किलोचा घागरा आणि जाड दुपट्टा घालून हे गाणे शूट करण्याचा सल्ला दिला होता मात्र आलियाने त्याला नकार दिला. कारण गंगूबाईच्या जीवनात कधी असा आनंदाचा क्षण आला नाही. त्यामुळे भन्साळींनीदेखील आलियाच्या लूकमध्ये छेडछाड केली नाही. त्यांनी आलियाला कोणत्याही गाण्यात फँसी पोशाख घालू दिला नाही. चित्रपटात अजय देवगणच्या पात्रावर एकही गाणे चित्रीत केले गेले नाही.

  • महिनाभरात शूट झाली होती हुमाची कव्वाली

निर्मात्यांनी चित्रपटात एक कव्वालीदेखील ठेवली आहे. ही कव्वाली चित्रीत करण्यासाठीदेखील एक महिन्याचा वेळ लागला होता. हे गाणे आलियाच्या ऐवजी हुमा कुरैशीवर चित्रीत केले गेले आहे. हुमासोबत टीमने हे गाणे दहा दिवसांच्या सरावानंतर शूट केले होते. निर्मात्यांनी चित्रपटात एका दृश्याची परिस्थिती पाहून हे गाणे टाकले आहे, जेणे करुन ते बळजबरी टाकलेले वाटू नये.

बातम्या आणखी आहेत...