आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आले. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र आता संजय लीला भन्साळींना दिलासा देणारी बातमी आली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई शहर दिवाणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.
कुणी दाखल केली होती याचिका?
स्वत:ला गंगूबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा म्हणणा-या बाबूजी शाह यांनी ही याचिका दाखल केली होती. चित्रपटाचे पोस्टर आणि प्रोमो समोर येताच त्यांच्या आजूबाजुचे लोक त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना 'वेश्याचे कुटुंबीय' म्हणवून हिणवत असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र त्यांची ही याचिका आता न्यायालयाने फेटाळली आहे.
70 कोटींना विकले गेले आहेत चित्रपटाचे डिजिटल राइट्स
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबतमध्ये काम करत आहे. मोठ्या पडद्यानंतर हा डिजिटल प्लेटफार्मवर रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सला विकण्यात आले आहेत. अधिकार विकत घेण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. तब्बल 70 कोटींमध्ये या चित्रपटाचे अधिकार विकले गेले आहेत.
हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट
भन्साळींचा हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असून या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. असे सांगितले गेले आहे की, गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले होते.
या चित्रपटात आलियासह अभिनेता अजय देवगण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाची भूमिका वठवणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अवघ्या 10 दिवसांत अजय त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. चित्रपटात आलिया आणि अजय देवगण यांच्यासह शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट यावर्षी दिवाळीत रिलीज होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.