आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथच्या दोन चित्रपटांची बंपर कमाई:'गंगूबाई काठियावाडी'ला मिळाली फक्त 10 कोटींची ओपनिंग; पवन कल्याणच्या 'भीमला नायक'ने पहिल्या दिवशी जमवला 61 कोटींचा गल्ला

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गंगूबाई'सोबत रिलीज झाला 'भीमला नायक'

आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट रिलीज झाला आहे. यासोबतच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी 10.50 कोटींची ओपनिंग मिळवली आहे. आलियाचा चित्रपट चित्रपटगृहांत 50 % क्षमतेसह प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासह, समीक्षकांना आशा आहे की आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई वाढू शकते.

त्याचबरोबर साऊथ सुपरस्टार अजितचा 'वलिमाई' हा यावर्षीचा बंपर ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. वलीमाईने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. तामिळनाडूमध्ये त्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी आहे. त्याचवेळी चेन्नईमध्ये चित्रपटाने 1.84 कोटींची ओपनिंग केली आहे. चेन्नईमध्ये एवढी मोठी ओपनिंग मिळालेला अजितचा हा पहिलाच चित्रपट आहे.

'गंगूबाई'सोबत रिलीज झाला 'भीमला नायक'
आलियाच्या 'गंगूबाई'सोबतच साऊथच्या पवन कल्याणचा 'भीमला नायक' हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शन 61.24 कोटी रुपये आहे.

साऊथच्या चित्रपटांपेक्षा बॉलिवूडचे कलेक्शन ठरले फेल
कोविड काळात प्रदर्शित झालेल्या साऊथच्या चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन चांगले राहिले आहे. गेल्या वर्षी 13 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'मास्टर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 42 कोटींची कमाई केली होती. 4 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या 'अन्नाथे' या चित्रपटाने तामिळनाडूतच 34.92 कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले होते. मोहनलालच्या 'मरक्कर: लायन ऑफ द अरेबियन सी'ने पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली. दुसरीकडे, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज स्टार' 52.50 कोटींची ओपनिंग करून वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. तर दिवाळीत प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाने 26 कोटींची ओपनिंग केली होती.

बातम्या आणखी आहेत...