आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गंगुबाई काठियावाडी' शूटिंग अपडेट:'गंगुबाई'साठी भन्साळींनी बनवले दोन सेट, दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आलिया

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत पुन्हा सुुरु झाले चित्रपटाचे शूटिंग, तीन दिवस चालेल पॅचवर्क

अभिनेत्री आलिया भट्टने गुरुवारी आपल्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. याचे एकुण 2 ते 3 दिवसांचे पॅचवर्क उरले आहे. आलियासोबत गंगुबाईची गँग गर्लदेखील तिच्यासोबत शूटिंग करत आहे. सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शीने सांगितले, दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच सहकलाकारांनादेखील महत्त्व दिले आहे.

भन्साळींच्या या चित्रपटाची कथा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या काळातील आहे. गंगुबाई, जेव्हा पंतप्रधान नेहरु यांना भेटायला गेल्या होत्या, त्यावेळी कमाठीपुरा तोडण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटात त्या काळातील दिल्ली आणि मुंबईचा सेट उभारण्यात येणार आहे.

  • दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार गंगुबाई

चित्रपटाच्या मेजर पोर्शनची शूटिंग फिल्म सिटीच्या सुनील मैदानात करण्यात आली आहे. तेथून जवळच आणखी एक सेट उभारण्यात आला आहे. जेथे गंगुबाईच्या भूतकाळातील भागदेखील शूट केला गेला. खरं तर, गंगुबाईला दोन वेगवेगळ्या लूकमध्ये दाखवण्यात येणार आहे. एकामध्ये ती 15 वर्षांची असताना तर दुस-यामध्ये ती कमाठीपुरामध्ये पोहोचलेली आहे.

  • जाड दिसण्यासाठी घातली कॉटन साडी

याव्यतिरिक्त वयस्कर लूकमध्ये जाड दिसण्यासाठी भन्साळींनी आलिया पूर्ण चित्रपटात कॉटन साडी नेसायला लावली. कॉटन साडीत ती थोडी जाड दिसली. त्यामुळे तिला वजन वाढवण्याची गरज पडली नाही.

  • शांतनूसोबत रोमँटिक अँगल

पॅचवर्कमध्ये आलियाचे मुख्य सीन चित्रीत केले जाणार आहेत. चित्रपटाच्या गाण्याचे बरेच शूटिंग झाले आहे. यातील एक रोमँटिक गाणे आलिया आणि शांतनू माहेश्वरीसोबत चित्रीत करण्यात आले आहे. शांतनू आणि आलियामध्ये रोमँटिक अँगल दाखवण्यात आला आहे.

  • आलियाने रणवीरच्या स्टाइलची केली कॉपी

सेटवरील उपस्थित सदस्यांनी सांगितले, आलियाने या चित्रपटात आपले पात्र जीवंत वाटण्यासाठी रणवीर सिंहची पद्धत आत्मसात केली आहे. ज्या प्रकारे रणवीर सिंह 'बाजीराव मस्तानी'च्या शूटिंगवेळी गंभीर आणि रागात राहायचा. बाजीराव यांचे पात्र जीवंत वाटावे म्हणून भन्साळींकडून त्याला निर्देश मिळाले होते, की सेटवर कमी लोकांशी बोलायचे. भन्साळींनी इतर पात्रासह आलियाकडूनही बरीच मेहनत करुन घेतली आहे.

  • अजय देवगणच्या कॅमिओ पात्राला दिला विटेंज लूक

विशेष म्हणजे या चित्रपटात अजय देवगणचा एक कॅमिओ रोल आहे. यात तो करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजयने करीम लालाच्या ड्रेसिंगची कॉपी करताना विटेंज लूक पसंत केला आहे. गंगुबाईच्या जीवनात करीम लालाच्या एंट्री ती राजकारणात प्रवेश करते तेव्हा होते. गंगुबाईंनी करीम लालाच्या पाठिंब्यांने आपली ओळख निर्माण केली.

बातम्या आणखी आहेत...