आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायटल वाद:'गंगूबाई काठियावाडी'चे शीर्षक बदलण्याची करण्यात आली होती मागणी, वादानंतर या चित्रपटांनाही रिलीजपूर्वीच बदलावे लागले होते शीर्षक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट-

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट स्टारर हा चित्रपट रिलीजआधी वादाच्या भोवऱ्यात सापडला. गंगूबाईच्या कुटुंबीयांनी चित्रपटात त्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडल्याबद्दल आक्षेप घेत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. तर महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. यामुळे कामाठीपुरा शहराचे नाव खराब होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

मात्र कोर्टाने या प्रकरणावर चित्रपटाच्या बाजूने निकाल दिला. हा चित्रपट कोणत्याही अटी आणि शर्तीविना प्रदर्शित होणार असल्याची माहिती कोर्टाने दिली, त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

यापूर्वीदेखील अनेक चित्रपटांच्या शीर्षकावरुन वादंग उठले होते. वाद टाळण्यासाठी शीर्षक बदलून चित्रपट रिलीज करण्यात आले होते. जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट-

लक्ष्मी

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपटाचे शीर्षकही वादात सापडले होते. चित्रपटाचे नाव आधी 'लक्ष्मी बॉम्ब' होते. माता लक्ष्मीच्या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरल्याने अभिनेते मुकेश खन्ना यांच्यासह अनेकांनी चित्रपटाला विरोध केला होता. वाद वाढत गेल्याने चित्रपटाचे शीर्षक लक्ष्मी करण्यात आले होते.

पद्मावत​​​​​​​

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर पद्मावत अनेक कारणांमुळे वादात सापडला होता. राजपूत समाजाने चित्रपटावर समाजाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला होता, तर करणी सेनेने राणी पद्मावतीच्या चुकीच्या चित्रणाचा निषेध केला होता. शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळी यांना करणी सेनेच्या लोकांनी मारहाण केली होती. हा चित्रपट वादात अडकल्यानंतर 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र कागदपत्रांच्या अभावामुळे त्याचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. नंतर काही दृश्ये आणि शीर्षक बदलल्यानंतर हा चित्रपट 25 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित झाला होता.

गोलियों की रासलीला: राम-लीला

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गोलियों की रासलीला: राम-लीला या चित्रपटाचे शीर्षक नाव आधी रामलीला असे होते. ही एक प्रेमकथा होती, ज्याची रामलीलाशी तुलना केल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता. नंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती, त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला. दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाचे शीर्षक बदलेपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती.

जजमेंटल है क्या

कंगना रनोट आणि राजकुमार राव स्टारर चित्रपट 'जजमेंटल है क्या'चे नाव याआधी 'मेंटल है क्या' असे होते. मेंटल हेल्थसाठी काम करणा-या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर शीर्षक बदलण्यात आले.

आर राजकुमार

प्रभू देवा दिग्दर्शित आर राजकुमार हा चित्रपट 2013साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव आधी रॅम्बो राजकुमार असे होते जे नंतर बदलावे लागले. रॅम्बो या हॉलिवूड चित्रपटाचा या नावावर कॉपीराइट आहे, ज्याचा वापर केल्याने निर्माते कायदेशीर अडचणीत आले असते. चित्रपटाच्या शीर्षकासह शाहिद कपूरच्या पात्राचे नावही बदलण्यात आले आहे.

मद्रास कॅफे

जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरी स्टारर चित्रपटाचे नाव सुरुवातीला जाफना होते जे श्रीलंकेतील एक शहर आहे. यावर श्रीलंका सरकारने आक्षेप घेतला होता. या चित्रपटाचे नाव नंतर मद्रास कॅफे असे ठेवण्यात आले. हा चित्रपट हिट ठरला. 2013 मध्ये प्रदर्शित झालेला मद्रास कॅफे हा चित्रपट राजीव गांधी हत्या प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटात अनेक राजकीय पक्षांची नकारात्मक प्रतिमा दाखवण्यात आली होती, त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. तमिळनाडूमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

टोटल सियाप्पा​​​​​​​​​​​​​​

टोटल सियाप्पा या चित्रपटाचे नाव आधी चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा अमन आणि आशा यांच्या नावावर ठेवण्यात आले होते परंतु हे नाव पाकिस्तानातील जागरण ग्रुप आणि टाइम्स ऑफ इंडियाने आधीच घेतले आहे. कॉपीराईट टाळण्यासाठी रिलीजपूर्वी चित्रपटाचे नाव बदलून टोटल सियाप्पा करण्यात आले.

हसिना पारकर​​​​​​​​​​​​​​

दाऊद इब्राहिमची बहीण हसीनावर बनलेला हसिना पारकर हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे नाव आधी 'द क्वीन ऑफ मुंबई : हसिना' असे होते. श्रद्धाचा दमदार लूक प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट प्रसिद्धीझोतात आला होता, पण मुंबईशिवाय संपूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटाच्या नावातून मुंबई हे नाव हटवून हसीना पारकर करण्यात आले.

लवयात्री​​​​​​​​​​​​​​

या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच लवरात्री हे नाव खूप वादात सापडले होते. तसेच सलमान खानवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर चित्रपटाचे नाव लवरात्री वरून बदलून लवयात्री असे करण्यात आले.

बिल्लू

शाहरुख खान, इरफान पठाण आणि लारा दत्ता स्टारर बिल्लू या चित्रपटाचे नाव आधी बिल्लू बार्बर असे होते. चित्रपटाच्या शीर्षकात बार्बर हा शब्द असल्यामुळे त्याविरोधात या समाजाने आवाज उठवला होता. शीर्षकावरून वाद वाढल्यावर निर्मात्यांनी चित्रपटातून 'बार्बर' हा शब्द काढून चित्रपटाचे नाव बिल्लू असे ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...