आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगूबाई काठियावाडी:गंगूबाईच्या भूमिकेसाठी आलिया भट्टला मिळाले अजय देवगणपेक्षा जास्त मानधन, इतर स्टार्सनीही घेतली मोठी रक्कम

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कलाकारांनी किती मानधन घेतले आहे ते जाणून घेऊया -

'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, विजय राज यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका वठवल्या आहेत. या कलाकारांनी ही पात्रे साकारण्यासाठी किती मानधन घेतले आहे ते जाणून घेऊया -

चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी ही मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांमधला आलियाचा अभिनय पाहून प्रेक्षकांच्या चित्रपटाकडे असलेल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

या चित्रपटात अजय देवगण रहिम लालाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही एक छोटी भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय 23 वर्षांनंतर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करत आहे. यापूर्वी त्याने त्यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात विजय राज रझियाबाईची भूमिका साकारत आहे. रझियाच्या लूकमध्ये विजयला पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

टीव्ही अभिनेता शंतनू माहेश्वरी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो गंगूबाईचा प्रियकर रमणिक लाल याच्या भूमिकेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिम या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये किंवा गाण्यांमध्ये हुमाची झलक दिसली नाही, पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर ती या चित्रपटात दिलरुबा नावाची एक छोटीशी भूमिका साकारत आहे.

बातम्या आणखी आहेत...