आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग कार्ड:गौहर खान आणि जैद दरबारची लग्नपत्रिका पाहिलीत का तुम्ही!  क्रिएटिव्ह कार्डमधून दाखवली लॉकडाउन लव्हस्टोरी

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन दरम्यान गौहर आणि झैद यांची प्रेमकहाणी कशी फुलली हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

अभिनेत्री गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार येत्या 25 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही घरी लगीनघाई सुरु आहे. नुकतीच या दोघांची लग्नपत्रिका समोर आली आहे. अतिशय क्रिएटिव्ह अशी ही लग्नपत्रिका आहे. गौहरने सोशल मीडियावर आपल्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ शेअर केला आहे. लॉकडाउन दरम्यान गौहर आणि झैद यांची प्रेमकहाणी कशी फुलली हे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

गौहर आणि झैद हे दोघं एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि त्यांनी कसे प्रपोज केले हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ‘जब वी मेट’ असे कॅप्शन देत गौहरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांची ही लग्नपत्रिका अनोखी आहे.

झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे. तो एक टिकॉटक स्टार होता. विशेष म्हणजे गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. 25 डिसेंबर रोजी मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये दोघांचा लग्नसोहळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...