आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झैद-गौहरचे नाते:गौहर खानने 11 वर्षांनी लहान झैदसोबत केला साखरपुडा, झैदचे वडील इस्माईल दरबार म्हणाले - 'मला सोशल मीडियावरुनच समजले, माझ्याकडे लग्नाचा विषय काढला नाही'

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • झैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे.

अभिनेत्री गौहर खान हिने अलीकडेच गायक-संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारसोबत साखरपुडा केला. गौहर आणि झैद यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन साखरपुड्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. रिपोर्ट्सनुसार, गौहर आणि झैद दोघेही 25 डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत. मात्र, इस्माईल दरबार यांनी सांगितल्यानुसार, अद्याप लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही.

सोशल मीडियावरुनच समजले - इस्माइल दरबार
दिव्य मराठीसोबत झालेल्या संभाषणादरम्यान इस्माईल म्हणाले- “ज्याप्रकारे गौहर आणि झैद यांच्या पोस्ट बघून लोकांना त्यांच्या साखरपुड्याविषयी समजले, त्याचप्रमाणे मलादेखील तेथूनच कळले. खरे सांगायचे तर आमच्या कुटुंबात अजूनही मुलं वडीलधा-यांकडे स्वतःच्या लग्नाचा विषय काढत नाहीत. आतापर्यंत झैदने एकदाही माझ्याकडे आपल्या लग्नाचा विषय काढलेला नाही.''

गौहरचा उल्लेख त्याने आपल्या आईकडे केला होता
इस्माईल पुढे म्हणाले, ''मला सांगायची हिम्मत त्याच्याकडे नाही. तो त्याच्या आयशा अम्मीच्या अगदी जवळ आहे. त्याने आपल्या आईला गौहरबद्दल सांगितले आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. आयशाने मला याबद्दल सांगितले आणि मी ते मान्य केले. माझ्या मुलाने हिंदुस्तानातील कोणतीही मुलगी पसंत केली तरी मी त्याच्या निर्णयाचा आदर करेल. मला फक्त त्याचा आनंद हवा आहे. तो आणि गौहर एकमेकांबद्दल गंभीर आहेत आणि मला यात काहीच अडचण नाही. माझा एकमेव हेतू म्हणजे माझ्या मुलाचा आनंद आहे."

लग्नाची तारीख ठरली नाही
लग्नाच्या तारखेसंदर्भात इस्माईल म्हणाले - ''सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे मला समजले. त्याने आपल्या आईला देखील हेच सांगितले की, जेव्हा त्याला असे वाटते की लग्न करायचे आहे, तेव्हा तो मला येऊन भेटेन. ज्या दिवशी झैद माझ्याकडे लग्नाविषयी बोलेल तेव्हा आम्ही पुढे जाऊ. मला माझ्या मुलाला सेटल झालेले बघायचे आहे. लवकरच त्यांचे लग्न लावू, लग्नाची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. या वर्षाच्या अखेरीस नक्कीच काहीतरी चांगले होईल.''