आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री झाली आई:गौहर खानने दिला मुलाला जन्म, पोस्ट शेअर करत म्हणाली - 'आनंदाचा खरा अर्थ काय हे कळले'

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान झाली आई, पोस्ट करत म्हणाली “आम्हाला आनंदाचा खरा अर्थ…”

प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आई झाली आहे. 10 मे रोजी तिने मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी गौहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुष्का शर्मा, दीया मिर्झा, विक्रांत मैसी आणि मृणाल ठाकूर यांसह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी गौहर आणि झैद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गौहर खान आणि झैद दरबार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, "आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत. 10 मे 2023 ला आम्हाला आमच्या आनंदाचा खरा अर्थ काय हे कळले. तुमचे प्रेम आणि प्रार्थनेबद्दल आभार. कृतज्ञ आणि नवीन पालक झैद आणि गौहर."

गौहरने हटके अंदाजात जाहीर केली होती प्रेग्नेंसीची बातमी

गौहरने अतिशय वेगळ्या पद्धतीने चाहत्यांना ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. कार्टूनचा मजेशीर व्हिडिओ शेअर करत तिने म्हटले, 'गौहर झैद आणि + 1'. या व्हिडिओला तिने कॅप्शन लिहिले आहे, "आनंददायी प्रवासाची सुरुवात करताना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे."

कोण आहे गौहर खान?

गौहर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सिरीजमध्ये काम केले आहे. गौहरने नुकतीच नेटफ्लिक्सवर '14 फेरे की कहानी' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

कोण आहे झैद दरबार?

झैद दरबार हा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार हे त्याचे वडील आहेत. याशिवाय, झैदचा धाकटा भाऊ आवेज दरबार हा प्रसिद्ध टिक टॉकर असून अनेक म्युझिक अल्बम्समध्ये झळकला आहे.

25 डिसेंबर 2020 रोजी झाला होता निकाह

25 डिसेंबर 2020 रोजी या जोडप्याने मुंबईच्या ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये लग्न केले होते. गौहर आणि झैद यांच्या वयातील 12 वर्षांच्या फरकामुळे हे लग्न त्यावेळी खूप चर्चेत होते. कपलची लव्हस्टोरी चित्रपटापेक्षा कमी नव्हती. झैदने गौहरला पहिल्यांदा एका ग्रोसरी शॉपमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याने गौहरला मेसेज करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोघांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली, बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.