आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री गौहर खानने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स गौहर आणि तिचा पती झैद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
गौहरने हटके अंदाजात जाहीर केली प्रेग्नेंसीची बातमी
गौहरने अतिशय वेगळ्या पद्धतीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. कार्टूनचा मजेशीर व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलं आहे, 'गौहर झैद आणि + 1'. या व्हिडिओला तिने कॅप्शन लिहिले आहे, "आनंददायी प्रवासाची सुरुवात करताना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे."
कोण आहे झैद दरबार?
झैद दरबार हा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार हे त्याचे वडील आहेत. याशिवाय, झैदचा धाकटा भाऊ आवेज दरबार हा प्रसिद्ध टिक टॉकर असून अनेक म्युझिक अल्बम्समध्ये झळकला आहे.
25 डिसेंबर 2020 रोजी झाला होता निकाह
25 डिसेंबर 2020 रोजी या जोडप्याने मुंबईच्या ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये लग्न केले होते. गौहर आणि जैद यांच्या वयातील 12 वर्षांच्या फरकामुळे हे लग्न त्यावेळी खूप चर्चेत होते. कपलची लव्हस्टोरी चित्रपटापेक्षा कमी नव्हती. झैदने गौहरला पहिल्यांदा एका ग्रोसरी शॉपमध्ये पाहिले होते. त्यानंतर त्याने गौहराल मेसेज करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोघांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली, बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर लगेच तीन महिन्यात गौहर प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे गौहर खूप भडकली होती. येत्या 25 डिसेंबरला गौहरच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.