आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग प्रकरण:NCB च्या ऑफिसमधून मुलगा आर्यनला भेटून बाहेर पडताना गौरी खानला अश्रू अनावर, समोर आला व्हिडिओ

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौरी खान मुलगा आर्यन खानला भेटायला एनसीबी ऑफिसमध्ये गेली होती.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी सध्या तरी कमी होताना दिसत नाहीयेत. आर्यन खानला अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. 22 तासांच्या चौकशीनंतर त्याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली. एनसीबीने आरोपींच्या कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंतची वाढ करण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने ती फेटाळली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी वैद्यकीय चाचणी नंतर आर्यनला आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले.

गौरी खान मुलगा आर्यन खानला भेटायला एनसीबी ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी गौरीसोबत शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी देखील हजर होती. व्हिडिओमध्ये गौरी खान गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. तिला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.

आर्यनला आर्थर रोड जेलमधील क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जरी त्याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु कारागृहाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्याला 7 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्याचा नियम आहे. खरं तर, न्यायालयाने गुरुवारी सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, परंतु सुनावणी उशिरापर्यंत चालली आणि संध्याकाळी 6 नंतर जेलमध्ये प्रवेश नाही, त्यामुळे आर्यनसह 8 आरोपींना एनसीबीच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी त्याची रवानगी तुरुंगात झाली.

आर्यनच्या वकिलांनी दाखल केल्या आहेत दोन याचिका

आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात दोन जामीन अर्ज दिले आहेत. दोघांपैकी एक अंतरिम जामिनासाठीची याचिका आहे जेणेकरून आर्यनला तत्काळ जामीन मिळावा आणि दुसरा नियमित जामिनासाठी आहे म्हणजे जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत असेल तोपर्यंत त्याला जामिनावर राहता यावे. दुसरीकडे, एनसीबीने एनडीपीसी कायद्यांतर्गत नियमित जामिनाला आधीच विरोध केला आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने 24 तास चाललेल्या सुनावणीनंतर गुरुवारी आर्यनसह सर्व 8 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...