आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी खानने सांगितले डायमंड नेमप्लेटमागील सत्य:फोटो शेअर करत म्हणाली - नेमप्लेटमध्ये काचेचे क्रिस्टल लावले आहेत

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नेमप्लेटमध्ये डायमंड लावले असल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. मात्र आता शाहरुखची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खान हिने स्वतः एक पोस्ट शेअर करत नेमप्लेटमध्ये खरंच डायमंड लावण्यात आले आहेत की नाही, हे सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर गौरीने मन्नतच्या नेमप्लेटजवळ काढलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच नेमप्लेटमध्ये डायमंड नव्हे तर काचेचे क्रिस्टल लावण्यात आले आहेत, असेही सांगितले.

बंगल्याच्या नावाची पाटी ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते

गौरीने 22 ऑक्टोबर रोजी मन्नतच्या पाटीसह स्वतःचा फोटो शेअर केला. यात ती मन्नत बंगल्याच्या बाहेर गेटजवळ उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या बाजूला ‘मन्नत’ नावाची नवीन पाटीही पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले, "तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांचा एंट्री पॉईंट असतो. त्यामुळे बंगल्याच्या नावाची पाटी ही सकारात्मक उर्जा आकर्षित करते. याच कारणामुळे आम्ही एका ट्रान्सपरंट प्लेटच्या आत काचेचे क्रिस्टल लावले आहेत. यामुळे सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शांत वातावरण राहते", असे गौरी म्हणाली आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण?
गेल्या अनेक दिवसांपासून किंग खानचे चाहते मन्नतच्या मेन गेटचे फोटो शेअर करत होते. ज्यामध्ये त्याच्या घराची नेमप्लेट दिसतेय. नेमप्लेटमध्ये डायमंड आणि एलईडी दिवे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता ही बातमी खोटी ठरली आहे.

चाहत्यांनी पुष्टी केल्याबद्दल गौरीला धन्यवाद म्हटले

गेल्या अनेक दिवसांपासून मन्नतची नेमप्लेट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चाहते शाहरुखच्या घरावरील नवीन नेमप्लेटसह फोटो शेअर करत होते. आता गौरीच्या कन्फर्मेशन पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले- 'ही नेमप्लेट डायमंडची नाही याची पुष्टी केल्याबद्दल धन्यवाद' तर आणखी एकाने लिहिले, 'गौरी खानचे डिझाइन नेहमीच सर्वोत्तम असतात.'

शाहरुखसाठी मन्नत आहे खूप खास
हे घर शाहरुख खानने 2001 मध्ये 13.32 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आज या घराची किंमत जवळपास 350 कोटी इतकी आहे. पूर्वी शाहरुखला या बंगल्याचे नाव 'जन्नत' ठेवायचे होते, पण नंतर तो त्याच्या स्वप्नातील बंगला असल्याने त्याने त्याचे नाव 'मन्नत' ठेवले.

शाहरुखचे तीन चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहेत
2023 मध्ये किंग खान त्याच्या 3 बहुप्रतिक्षित चित्रपटांसह सज्ज आहे. पुढच्या वर्षी किंग खान पठाण, जवान आणि डंकी या चित्रपटात दिसणार आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला, जवान जूनमध्ये आणि राजकुमार हिरानीचा डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. बऱ्याच काळानंतर शाहरुख अभिनेता बॉक्स ऑफिसवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्याने ब्रह्मास्त्र आणि रॉकेट्री सारख्या चित्रपटात कॅमिओ केला होता. झिरो हा त्याचा शेवटचा चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. अशा परिस्थितीत शाहरुखला त्याच्या तिन्ही चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत.

बातम्या आणखी आहेत...