आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोशूट:मुलीसाठी फोटोग्राफर झाली गौरी खान, विदाऊट मेकअप ग्लॅमरस दिसली सुहाना खान

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौरी खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुहानाच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

शाहरुख खानची मुलगी सुहाना अशा स्टारकीड्सपैकी एक आहे जी बॉलिवूड डेब्यूशिवाय चर्चेत असते. तिची छायाचित्रे बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच पुन्हा एकदा सुहानाचे ग्लॅमरस फोटोशूट व्हायरल होत असून हे फोटो एखाद्या फॅशन फोटोग्राफर नव्हे तर तिची आई गौरी खान हिने क्लिक केले आहेत.   गौरी खानने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुहानाच्या फोटोशूटचे फोटो शेअर करुन माहिती दिली की, हे फोटो तिने स्वतः घेतले आहेत. यासह गौरीने लिहिले, 'केस नाही, मेकअप नाही, फक्त माझी फोटोग्राफी'. जॅकलिन फर्नांडिस, सुझान खान, मनीष मल्होत्रा आणि फराह खान सारख्या अनेक स्टार्सनीही सुहानाच्या फोटोशूट आणि लूकचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

No hair !!!!! No make up !!!! Just my photography!!!!

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on May 14, 2020 at 8:08am PDT

  • अनन्या पांडेला आवडला टॉप

अनन्या पांडे, सुहाना आणि शनाया कपूर या तिघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. अनन्याने सुहानाच्या सुंदर छायाचित्रावर कमेंट केली आहे आहे. तिने लिहिले की, 'मला हे टॉप नक्कीच आवडले आहे, पण तू मला देणार नाही'.

  • सुहाना खानची मोठी आहे फॅन फॉलोइंग

बरेच दिवस आपले इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट ठेवल्यानंतर सुहानाने काही महिन्यांपूर्वी हे सार्वजनिक केले होते. सुहानाचे फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. सुहानाने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटची छायाचित्रेही शेअर केली आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे सुहाना परदेशातून मुंबईत परतली असून कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.

View this post on Instagram

my mum took these 😋 @gaurikhan

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on May 14, 2020 at 8:19am PDT

बातम्या आणखी आहेत...