आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'डियर कॉमरेड' आणि 'गीता गोविंदम' सारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांत काम केल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिकाने एक नव्हे तर दोन बॉलिवूड चित्रपट साइन केले आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत करतेय बॉलिवूड डेब्यू
रश्मिकाची बॉलिवूड एंट्री अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत होतेय. सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेला मिशन मजनू हा रश्मिकाचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट असेल. रश्मिका या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईत दाखल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असल्याचे सांगितले जाते.
The deadliest covert operation undertaken by our intelligence agency behind enemy lines !
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) December 23, 2020
Presenting the first look of #MissionMajnu pic.twitter.com/gYtLkWJKVA
मोठ्या बॅनरचा आणखी एक चित्रपट केला साइन
मिशन मजनू या चित्रपटाशिवाय रश्मिकाने आणखी एका मोठ्या बॅनरचा चित्रपट साइन केला आहे, मात्र या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इतकेच नाही तर रश्मिका आणखी काही हिंदी चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सही वाचत असल्याच्या बातम्या आहेत.
रश्मिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2016 मध्ये किरिट पार्टी या चित्रपटाद्वारे तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. किरिट पार्टीनंतर रश्मिकाने अंजनी पुत्रा (2017), चमक (2017), चालो (2018), गीता गोविंदम (2018)आणि यजमान (2019) या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. एकमागोमाग एक हिट चित्रपट दिल्यानंतर रश्मिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री ठरली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.