आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म प्रकरण:बलात्काराच्या आरोपांवर गहना वशिष्ठ म्हणाली, 'मी राज कुंद्राला पाठिंबा दिला म्हणून माझ्याविरोधात कट रचला जात आहे'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गहनाने एका मुलाखतीत आपली बाजू मांडली.

पॉर्न फिल्म प्रकरणामुळे चर्चेत आलेली गहना वशिष्ठच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर बलात्काराचे खोटे आरोप लावण्यात आले आहेत. ज्या मुलीने तिला बलात्कार प्रकरणात गोवले तिचा हेतू बरोबर नाही आणि तिने तिला या आरोपांमध्ये जाणीवपूर्वक अडकवले, असे गहनाचे म्हणणे आहे.

गहनाने एका मुलाखतीत आपली बाजू मांडली. ती म्हणाली, मला 21 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली, माझा फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला आहे. त्या डिवाइसमध्ये मी त्या मुलीसोबत केलेल्या सर्व चॅट आहेत, ज्यात तिने काम दिल्याबद्दल माझे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर तिने कामाच्या मोबदल्यात पैसे मागितले जे मी तिला दिले. पण त्यावेळी मला तिचा हेतू माहित नव्हता. फक्त पोलिसांनी माझे ते सर्व चॅट पाहावे आणि ते कोर्टात दाखवावे अशी माझी इच्छा आहे.

'राज कुंद्राला पाठिंबा दिल्यामुळे माझ्याविरोधात कट रचला गेला'

गहना पुढे म्हणाली, 'मला फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली, मग ती मुलगी तेव्हा पुढे का आली नाही आणि तिने तक्रार का नोंदवली नाही? राज कुंद्राच्या समर्थनार्थ मी पुढे आल्यामुळे हे घडले असे मला वाटते. त्या मुलीने हे षडयंत्र रचले जेणेकरून मी सत्य बोलू नये.'

काय आहे प्रकरण?
अलीकडेच, पोलिसांनी दोन पीडितांची विधाने जारी केली होती, ज्यात गहना आणि रोवा खान यांच्यावर धमकी देऊन अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने शूट केल्याचा आरोप होता. दोन्ही मुलींनी मड आयलंड येथील एका बंगल्यात शूटिंग केल्याबद्दल सांगितले होते.

पीडितेने गहना वशिष्ठवर बलात्काराचा आरोप केला होता. पीडित मुलगी 20 वर्षांची असून तिने हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका वेब सीरिजच्या शूटिंगच्या नावाखाली तिला मड आयलंडला बोलावले होते आणि मानधन म्हणून 10,000 रुपये देणार असल्याचे सांगितले होते. पीडिता म्हणाली की, मला सांगण्यात आले की गहना या शोची निर्माती आहे. ती मला भेटली आणि सांगितले की, वेब सीरिज राजा, राणीवर आधारित आहे. शूटिंग दरम्यान, मला धमकी देण्यात आली आणि जबरदस्तीने एका खोलीत नेण्यात आले, तिने तिघा जणांनी माझ्यावर बळजबरी केली. यानंतर गहनाने मला नवीन कपडे दिले आणि शूटवर जाण्यास सांगितले, मी नकार दिला तर गहनाने मला धमकी दिली.

पीडितेने सांगितल्यानुसार, गहनाने मला म्हटले की, शूटिंगसाठी 10 लाख खर्च झाले आहेत आणि जर मी शूट अर्धवट सोडले तर मला 10 लाख द्यावे लागतील. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे इतके पैसे नाहीत. यानंतर आकाश नावाचा मुलगा तेथे आला आणि त्याने माझ्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मी गहनाला मला तेथून जाऊ दे अशी विनवणी केली, मग तिने मला धमकी दिली की, जर मी इतर कुणाला किंवा पोलिसांना शूटिंगबद्दल सांगितले तर परिणाम चांगले होणार नाहीत.

गहना सध्या जामिनावर बाहेर आहे

मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा पॉर्न प्रकरणी गहनालाही समन्स बजावले आहे. ती अद्याप गुन्हे शाखेसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झालेली नाही. या प्रकरणात, गहना आणि तिच्या साथीदारांना 21 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली. पाच महिन्यांनंतर गहनाची जामिनावर सुटका करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...