आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न फिल्म प्रकरण:गहना वशिष्ठचा दावा - राज कुंद्रा बॉलिफेम नावाचे नवीन अ‍ॅप लाँच करणार होता, मेहुणी शमिता शेट्टीही करणार होती काम

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका नवीन मुलाखतीत गहनाने अनेक खुलासे केले आहेत.

राज कुंद्राच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करणारी गहना वशिष्ठ त्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. राज कुंद्रापुर्वी गहनाला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झाली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाने एका मुलाखतीत राजचा बचाव करताना पूनम पांडेला लक्ष्य केले होते. आता एका नवीन मुलाखतीत गहनाने इतरही अनेक खुलासे केले आहेत.

गहना वशिष्ठ हिच्यावरही अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला जामीन मिळाला.
गहना वशिष्ठ हिच्यावरही अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला जामीन मिळाला.

राज कुंद्रा मेहुणी शमिताला देणार होता काम

गहनाने एका मुलाखतीत सांगितले, 'राजच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेले होते. तेथे मला कळले की तो बॉलिफेम नावाचे एक नवीन अ‍ॅप लाँच करण्याची तयारी करत आहे. या अ‍ॅपवर त्याचा चॅट शो, रिअ‍ॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, फीचर फिल्म दाखवण्याचा विचार होता. या अ‍ॅपच्या कंटेंटवर बोल्ड सीन्ससाठी त्याची कोणतीही प्लानिंग नव्हती. मी आणि राज यांनी काही स्क्रिप्टवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान आम्ही शमिता शेट्टीला स्क्रिप्टमध्ये कास्ट करण्याचा विचार केला. सई ताम्हणकर आणि इतर काही कलाकारांची नावेही विचारात घेण्यात आली. मी या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होते आणि याच दरम्यान राजला अटक करण्यात आली.'

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि शमिता शेट्टी.

गहनाने पुढे सांगितल्यानुसार, माझे काम फक्त हे चित्रपट दिग्दर्शित करण्यापूरते होते. चित्रपटासाठी शमिता किती पैसे घेणार होती आणि तिच्या काय अटी होत्या, याबद्दल मला काही माहित नव्हते शमिताने उमेश कामतशी यावर चर्चा केली होती आणि यासाठी तिने होकार दिला होता, असे गहनाने सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात गहनाला झाली होती अटक
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहाना वशिष्ठसह 6 जणांना अटक केली होती. नंतर आणखी तीन लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणात दोन एफआयआर नोंदविण्यात आल्या. एका अभिनेत्रीला अश्लील चित्रपटांसाठी न्यूड सीन चित्रित करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

शूट केलेले चित्रपट पेड मोबाइल अप्लिकेशनवर रिलीज झाले आहेत, हे त्यावेळी तपासात समोर आले होते. यानंतर पोलिसांनी अलीकडेच या प्रकरणाशी संबंधित उमेश कामत नावाच्या व्यक्तीला अटक केली. कामतच्या अटकेनंतर पोलिसांना मोठी लीड मिळाली आणि अश्लील चित्रपटांच्या या रॅकेटमधील राज कुंद्राचे कनेक्शन समोर आले. राज कुंद्रा पॉर्न चित्रपट प्रकरणातील सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...