आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक हात मदतीचा:जिनीलिया आणि रितेश देशमुख पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी आले पुढे, चित्रपट महामंडळाला केली आर्थिक मदत 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिनीलिया आणि रितेशने इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक कोरोना महामारीमुळे आपल्याला सामोरा आलेला लाँकडाऊन, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट यास्वरुपात मदत चालू केली.

आतापर्यंत 2 हजार सभासदांपर्यंत ही मदत पोचवली गेली आहे. परंतु महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत 5 हजारपेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता गरजुंची संख्या वाढत असल्यामुळे महामंडळाने कलाविश्वातील सेलिब्रिटींनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे महामंडळाने केलेल्या या आवाहनाला रितेश-जिनीलियाने मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

जिनीलिया आणि रितेश देशमुख  यांनी त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीतर्फे 10 लाखांची मदत केली आहे. तसेच त्यांनीही इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. अ.भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी देशमुख दाम्पत्याचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...