आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संकल्प:रितेश-जिनिलिया देशमुख यांचा अवयवदानाचा निर्णय, म्हणाले - दीर्घ काळापासून याबाबत विचार करत होतो 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर्स डेचे औचित्य साधत रितेश आणि जिनिलिया यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुख यांनी  एक स्तुत्य निर्णय जाहीर केला. रितेश-जिनिलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत दोघांनी अवयवदानाची माहिती दिली.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना जिनिलियाने  लिहिले, 'रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य झाले नव्हते. डॉक्टर दिनाचे औचित्य साधत आम्ही अवयवदान करण्याची शपथ घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर आणि फोग्सी यांचे आभार.'

आयुष्य सर्वात सुंदर भेट 

पुढे जिनिलिया लिहिले, 'तुम्हाला एखाद्यास सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असेल, तर ‘आयुष्य’ हेच ते गिफ्ट आहे. या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या” असे आवाहन रितेश-जिनिलिया यांनी केले आहे.

रितेश म्हणाला - खूप विचार केला

व्हिडिओत रितेश म्हणतोय, 'मी आणि जिनिलियाने याबाबत बराच विचार केला, चर्चा केली. दुर्दैवाने ते आतापर्यंत घडू शकले नव्हते. पण 1 जुलै रोजी आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दोघांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.'

0