आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे जेनिलिया:पहिल्या भेटीत जेनिलियाला मुळीच आवडला नव्हता रितेश, 'तुझे मेरी कसम'च्या शूटिंगदरम्यान वाढली जवळीक आणि 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर थाटले होते लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेनिलिया-रितेशच्या क्यूट लव्ह स्टोरी

बॉलिवूड अभिनेत्री जेनिलिया डिसुजा देशमुख हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. 2003 मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. तिचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर जेनिलियाची भेट रितेश देशमुखसोबत झाली आणि हे दोघे आयुष्यभराचे जोडीदार झाले. तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्न केले आणि आता हे दोघे दोन मुलांचे आईवडील आहेत.. या जोडीकडे बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून पाहिले जाते. एक नजर टाकुया जेनिलिया-रितेशच्या क्यूट लव्ह स्टोरीवर...

अशी होती पहिली भेट
रितेश-जेनिलिया यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते. रितेश आणि जेनिलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी 16 वर्षीय जेनिलिया तिच्या आईसोबत होती. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अ‍ॅटीट्युड असणार असे जेनिलियाला वाटत होते त्यामुळे जेव्हा रितेश आला आणि त्याने जेनिलियासोबत हातमिळवणी केली. त्याच्यानंतर तिने अगोदरच त्याला अ‍ॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जेनिलिया ऑकवर्ड असल्याचे वाटले, पण जेनिलियाच्या आईसमोर अतिशय नम्रपणे रितेश वागत होता. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणे बोलणे पाहून जेनिलियाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि त्याच्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.

जेनिलियाला मिस करायला लागला होता रितेश
रितेश आणि जेनिलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा तो आणि जेनिलिया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे चालु केले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही. दोघे एकमेकांना भेटायला नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत.

रितेश-जेनिलिया अडकले विवाहबंधनात
रितेश आणि जेनिलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्याचे कारण म्हणजे, जेनिलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.

लग्नाच्या दोन वर्षानंतर बनली आई
रितेश आणि जेनिलियाने लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा बनले. जेनिलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्यानंतर 1 जून 2016 रोजी रितेश जेनिलिया पुन्हा एकदा आईबाबा झाले.

रितेशने मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे आणि जेनिलियाचे फार क्वचितच भांडण होते. दोघांमध्ये काही मतभेद असले तरी ते कधीही एकमेकांवर ओरडत नाहीत. जर मतभेद निर्माण झाले तर रितेश पुढाकार घेऊन जेनिलियाची समजूत घालतो.

बातम्या आणखी आहेत...