आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांचा झाला रितेश देशमुख:मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशकडे केले होते चक्क दुर्लक्ष, असे पडले दोघे एकमेकांच्या प्रेमात

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रितेश-जेनेलिया यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते.

अभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहे. 17 डिसेंबर 1978 रोजी लातूर येथे रितेशचा जन्म झाला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असलेल्या रितेशने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मात्र या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची जोडीदार भेटली ती म्हणजे जेनेलिया.

याच चित्रपटाच्या सेटवर रितेश आणि जेनेलिया यांची भेट झाली. तब्बल 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले आणि आता हे दोघे दोन मुलांचे आईवडील आहेत.. या जोडीकडे बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून पाहिले जाते. एक नजर टाकुया रितेश-जेनेलियाच्या क्यूट लव्ह स्टोरीवर...

अशी होती पहिली भेट
रितेश-जेनेलिया यांनी एका मुलाखतीत आपल्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते. रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी 16 वर्षीय जेनेलिया तिच्या आईसोबत होती. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अ‍ॅटीट्युड असणार असे जेनेलियाला वाटत होते त्यामुळे जेव्हा रितेश आला आणि त्याने जेनेलियासोबत हातमिळवणी केली. त्याच्यानंतर तिने अगोदरच त्याला अ‍ॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जेनेलिया ऑकवर्ड असल्याचे वाटले, पण जेनेलियाच्या आईसमोर अतिशय नम्रपणे रितेश वागत होता. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणे बोलणे पाहून जेनेलियाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि त्याच्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.

जेनेलियाला मिस करायला लागला होता रितेश
रितेश आणि जेनेलियाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याला आणि जेनेलिया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे चालु केले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही. दोघे एकमेकांना भेटायला नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत.

रितेश-जेनेलिया अडकले विवाहबंधनात
रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्याचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.

लग्नाच्या दोन वर्षानंतर बनली आई
रितेश आणि जेनेलियाने लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा बनले. जेनेलियाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्यानंतर 1 जून 2016 रोजी रितेश जेनेलिया पुन्हा एकदा आईबाबा झाले.

रितेशने मुलाखतीत सांगितले होते की, त्याचे आणि जेनेलियाचे फार क्वचितच भांडण होते. दोघांमध्ये काही मतभेद असले तरी ते कधीही एकमेकांवर ओरडत नाहीत. जर मतभेद निर्माण झाले तर रितेश पुढाकार घेऊन जेनेलियाची समजूत घालतो.

बातम्या आणखी आहेत...