आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन झाले आहे. भाग्यश्रीचे वडील माधव लिमये हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे म्हटले जात आहे. सोलापूर येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
भाग्यश्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे म्हटले आहे.
या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, दीप्ती देवी, सायली संजीव, स्पृही जोशी, श्रुती मराठे, शशांक केतकर, संग्राम समेळ, शर्वरी लोहकरे, शिवानी बोरकर, अभिजीत खांडकेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
मुळची सोलापुरची आहे भाग्यश्री
'घाडगे अँड सून' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली भाग्यश्री मुळची सोलापूरची आहे. तीसहून अधिक फोटो जाहिरातीत मॉडेलिंग आणि तनिष्कच्या राष्ट्रीय जाहिरातीत काम केलेल्या भाग्यश्रीने चंदेरी दुनियेत आपले नाव कसदार अभिनयात कोरले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील भाग्यश्रीचे चौथीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये तर 12 वीपर्यंतचे शिक्षण इंडियन मॉडेल स्कूलमध्ये झाले आहे. पुढे मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमधून आपले बीसीए पूर्ण केले आणि थेट पुण्याचे सिम्बॉयसिस कॉलेज गाठले. तिथे एमसीए केले. मोठ्या कंपनीत नोकरी केली. दरम्यान, श्रावण क्वीन होण्याचा मान तिला मिळाला. आणि तिथून मॉडेलिंगच्या जगात तिने प्रवेश केला. त्यानंतर तिने कमीत कमी ३० जाहिराती केल्या. अनेक ऑडिशन दिल्यानंतर तनिष्कची रमेश भाटकर यांच्यासोबतची राष्ट्रीय स्तरावरची जाहिरात केली. त्यामुळे ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. भाग्यश्रीचे वडील माधव लिमये हे शिवशाही लक्ष्मी विष्णू येथील निवृत्त व्यवस्थापक होते, तर आई अनुराधा लिमये या नूमवि शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.