आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता वरुण धवनला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. वरुणनने नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म केले. पण यावेळी परफॉर्म करताना त्याने अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीद हिला उचलून तिच्या गालावर किस केले. या कृतीमुळेच तो सध्या ट्रोल होतोय. पण आता याबाबत वरुणनने स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली तर गिगी हदीद हिनेदेखील एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.
नेमके काय घडले?
नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची ग्रँड ओपनिंग सेरेमनी पार पडली. या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी जमली. अमेरिकन अभिनेत्री गिगी हदीदही या कार्यक्रमाला उपस्थित होती. तर या कार्यक्रमात वरुणने एक डान्स परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्सदरम्यान त्याने गिगीला स्टेजवर आणले. ती स्टेजवर येताच त्याने तिला उचलून घेतले आणि तिच्या गालावर किसही केले. वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ट्रोलर्सनी घेतली वरुणची शाळा
वरुणचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला सुनावले आहे. अभिनेत्रीची परवानगी न घेताच तिला किस केले हे नेटकऱ्यांना खटकले आहे. "हे सगळs करण्याच्या आधी तू तिची परवानगी घेतली होतीस?", असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी वरुणला विचारला आहे. इतकेच नाही तर "तू सेलिब्रिटी असशील पण ती तिथे पाहुणी म्हणून आली होती. परवानगी घेणे हे आवश्यक होते," असेही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तर एकाने म्हटले की, "म्हणून भारतात कोणीही सेलिब्रिटी येण्यास इच्छुक नसतात."
वरुणनने मांडली स्वतःची बाजू
ट्रोल होत असल्याने वरुणने एक ट्वीट करत स्वतःची बाजू मांडली. वरुणने एक ट्वीट करत गिगी हदीदचे स्टेजवर येणे हे आधीच ठरले होते असा खुलासा केला आहे.
गिगी हदीदने घेतली वरुणची बाजू
स्वतः गिगी हदीददेखील वरुणच्या बचावासाठी पुढे आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वरुणसोबतचा व्हिडिओ शेअर केला. "वरुण धवनने माझे बॉलिवूडचे स्वप्न पूर्ण केले," असे गिगी म्हणाली आहे.
आता स्वतः गिगी हदीदने वरुणची बाजू घेतल्याने ट्रोलर्सची बोलती बंद झाली, असे म्हणायला हरकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.