आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद:‘गोल्डफिंगर’ फेम अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅनचे निधन,  बाँड चित्रपटातून मिळाली होती प्रसिद्धी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅनने वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हॉलिवूडची अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन यांचे निधन झाले. या अभिनेत्रीने जेम्स बाँड सिरीज ‘गोल्डफिंगर’मध्ये बाँड गर्लची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ऑनर ब्लॅकमॅन यांनी टीव्ही मालिका ‘द अव्हेंजर’ मधून खूप प्रसिद्धी मिळवली होती. 

दिवंगत अभिनेत्रीचे कुटुंब म्हणाले, ‘ती फक्त एक चांगली कलाकाराच नाही तर एक चांगली आई आणि आजीदेखील होती. तिच्या आवाजात एक जादू होती आणि ती तिच्या कामाबाबत खूप वेडी होती. तिने सिनेजगतात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ती कायम आमच्या सर्वांसोबत जिवंत असेल.’ 

ब्लॅकमॅन यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांचे स्मरण करत आहेत. हॉलिवूडचे कलाकारदेखील त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...