आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:'गोलमाल' आणि 'मैं हूं ना'चा अभिनेता मुरली शर्माला मातृशोक, पद्मा शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्याच वर्षी मुरलीचे वडील ब्रिज भूषण शर्मा यांचेही निधन झाले होते.

'गोलमाल' आणि 'मैं हूं ना' सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता मुरली शर्माची आई पद्मा शर्मा यांचे 7 जून रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 76 वर्षांच्या होत्या. अभिनेत्री अश्विनी काळसेकरच्या त्या सासू होत्या. 

पद्मा यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच वर्षी मुरलीचे वडील ब्रिज भूषण शर्मा यांचेही वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पद्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्नी अश्विनीसोबत मुरली शर्मा
पत्नी अश्विनीसोबत मुरली शर्मा

बॉलिवूडमधील बड्या कलाकारांसोबत केलंय मुरली शर्माने काम

मुरली शर्मा बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. त्याने बहुतेक चित्रपटांमध्ये पोलिस अधिका-याची भूमिका साकारली आहे. शाहरुख खानच्या 'मैं हूं ना', सलमान खानच्या 'दबंग' आणि प्रभास स्टारर 'साहो'मध्ये तो झळकला आहे.  तर अलीकडेच वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या 'स्ट्रीट डान्सर 3 डी' मध्येही तो दिसला. मुरलीने अभिनेत्री अश्विनी काळसेकरशी लग्न केले आहे. 'अलावकुंथापुरमुलु' या तेलुगु अ‍ॅक्शन फिल्ममधील त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला. तो महेश बाबू आणि रश्मिका मंदानाच्या 'सरीलेरू निकेवारू'मध्येही दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...