आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुडबाय'चा ट्रेलर आऊट:इमोशन्स, कॉमेडी आणि ड्रामाचा तडका, अमिताभ-रश्मिकाची तू तू मैं मैं बघायला मिळणार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'गुडबाय' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एकता कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोन पिढ्यांमधील अंतर पाहायला मिळत आहे. एकंदरीत हा संपूर्ण फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदानाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ यांची तू तू मैं मैं पाहायला मिळणार आहे. त्यात इमोशन्स, कॉमेडी आणि ड्रामा सर्वकाही आहे. एवढेच नाही तर कॉमेडियन सुनील ग्रोवरही या चित्रपटात धमाल करणार आहे. 'गुडबाय'मध्ये अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'गुडबाय'चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. त्याचबरोबर एकता कपूरने विकाससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'गुडबाय' 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...