आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुव्ही रिव्ह्यू:जान्हवी कपूरच्या 'गुड लक जेरी'मध्ये एंटरटेन्मेंटचा तडका, क्लायमॅक्समध्ये जाणवतात थोड्या उणीवा

उमेशकुमार उपाध्याय6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूर स्टारर 'गुड लक जेरी' हा चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीत चढउतार सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होत्या. कॉमेडी, क्राइम आणि ड्रामाचा तडका असलेला गुड लक जेरी हा तामिळ चित्रपट कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.

कथा- चित्रपटाची कथा बिहार आणि पंजाबच्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज माफिया आणि पोलिस यांच्यातील लपाछपीवर आधारित आहे. चित्रपटात जया कुमारी उर्फ ​​जेरी (जान्हवी कपूर) मसाज पार्लरमध्ये काम करते, तर तिची धाकटी बहीण छायाचे शिक्षण सुरु आहे. जेरीची आई मोमोज बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवते. घरात या तीन स्त्रिया आहेत आणि या तिघींवर एकतर्फी प्रेम करणारे प्रेमी युगुलही आहेत. जेरीच्या आईवर शेजारी राहणारी एक व्यक्ती प्रेम करते तो स्वत:ला घरचा सदस्य समजतो, तर जेरीला (दीपक डोबरियाल) प्रेयसी मानतो.

दरम्यान एके दिवशी जेरीला तिच्या आईला सेकंड स्टेजचा लंग कॅन्सर असल्याचे समजते. डॉक्टर आईच्या उपचारांसाठी जेरीला 20 लाखांचा खर्च सांगतात. जेरी तिच्या आईच्या उपचारांसाठी मसाज पार्लरकडे मदत मागते, पण तिची निराशा होते. एके दिवशी जेरी तिच्या बहिणीसोबत खरेदीला जाते, तेव्हा पोलिस एका ड्रग्ज तस्कराचा पाठलाग करतात आणि तो ड्रग्ज तस्कर जेरीच्या दाराला धडकून खाली पडतो. पोलीस तस्कराला घेऊन जातात, पण येथूनच जेरी अंमली पदार्थांच्या तस्कराच्या संपर्कात येते आणि आईला वाचवण्यासाठी नाईलाजाने या व्यवसायात सामील होते. जेव्हा जेरीला ड्रग्जच्या व्यवसायातून बाहेर पडायचे असते तेव्हा कथा एक मनोरंजक वळण घेते. तेव्हा नेमके काय घडते, ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पाहावा लागेल.

अभिनय- अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर मध्यमवर्गीय बिहारी मुलीच्या जेरीच्या भूमिकेला शोभून दिसली. तिने बिहारी उच्चार तर फार चांगले पकडले आहेतच, पण हावभाव आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अभिनयाविषयी बोलायचे तर तिने दु:ख, भीती, प्रेम इत्यादी गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. जेरीच्या आईच्या भूमिकेत मीता वशिष्ठ यांनी भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. ड्रग्ज स्मगलरच्या भूमिकेत सुशांत सिंह असो, किंवा जसवंत सिंह दलाल, प्रत्येकाने आपलं पात्र जिवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

सर्वांचा लाडका दीपक डोबरियालचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. कथेत तो गमंत आणतो. एका प्रियकराचे पात्र त्याने अतिशय मजेशीर पद्धतीने जिवंत केले आहे. लेखनाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचा आलेख उंचावणारी छोटी पात्रे अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहेत की कथेत जिवंतपणा येतो. ही पात्रे कथेशी संबंधित वाटतात. संगीत देखील सरासरी आहे.

निष्कर्ष- चित्रपटातील कमकुवत पैलूंबद्दल बोलायचे तर बिहार आणि पंजाबच्या पार्श्वभूमीवर विणलेल्या कथेचे लोकेशन समजण्यापलीकडील आहेत. गाण्यांची कमतरताही भासते. चित्रपटाची आणखी कमकुवत बाजू म्हणजे त्याचा सेकंड पार्ट आणि क्लायमॅक्स.

कथा शेवटी शेवटी रंजक व्हायला हवी होती पण त्यासाठी त्याचा वेग वाढवून क्लायमॅक्स खराब केला आहे. असे असूनही कुटुंबातील प्रेम खूप उत्तमरित्या दाखवले आहे. कितीही संकट आले तरी त्यावर मात करता येते, हे यात दाखवण्यात आले आहे. लेखन-दिग्दर्शनाच्या पातळीवर हा पैलू अधिक चांगल्या प्रकारे मांडता आला असता. संपूर्ण चित्रपट पाहता, याला पाचपैकी तीन स्टार दिले जाऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...