आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांची झाली रश्मिका:गुगलने 2020 मध्ये रश्मिकाला दिला 'नॅशनल क्रश'चा किताब, इंस्टाग्रामवर आहेत 30 मिलियन फॉलोअर्स, सायकोलॉजीत घेतली मास्टर डिग्री

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया नॅशनल क्रश रश्मिकाच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से...

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 26 वर्षे पूर्ण केली आहेत. रश्मिकाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत केवळ 14 चित्रपट केले आहेत, परंतु पदार्पणाच्या 4-5 चित्रपटांनंतरच तिचे संपूर्ण भारतात चाहते झाले. रश्मिकाच्या क्यूटनेस आणि सौंदर्याने लोकांना वेड लावले आहे. कर्नाटकमध्ये, रश्मिकाचे टोपणनाव नॅशनल क्रश आहे. तर तिला एक्सप्रेशन क्वीनदेखील म्हटले जाते.

चला तर मग जाणून घेऊया नॅशनल क्रश रश्मिकाच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से...

5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेट येथे जन्मलेल्या रश्मिकाने मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रश्मिकाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, तिचे वडील मदन मंदाना हे क्लर्क म्हणून काम करायचे. रश्मिकाने 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अवघ्या 4 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 50 कोटींचे कलेक्शन केले आणि हा चित्रपट 2016 मधील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला.

कॉलेजमध्ये असताना, रश्मिकाने क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस 2014 स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तिने मॉडेलिंग असाइनमेंट घेण्यास सुरुवात केली.

अवघ्या 7 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये रश्मिकाने 14 चित्रपट केले असून त्यापैकी बहुतांश हिट ठरले. रश्मिका 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील तिच्या दमदार व्यक्तिरेखेसाठी देखील ओळखली जाते. इंस्टाग्रामवर रश्मिकाचे 3 कोटी फॉलोअर्स आहेत.

बंगळुरू टाइम्सच्या 2017 च्या 30 मोस्ट डिझायरेबल वुमनच्या यादीत रश्मिकाला पहिले स्थान मिळाले. रश्मिका ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्या चित्रपटांनी अल्पावधीतच टॉलिवूडमध्ये 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले.

रश्मिका मंदाना हा हॅशटॅग गुगल आणि ट्विटर दोन्हीवर कॉमन आहे. यामुळे गुगलने तिचे नाव 2020 मध्ये नॅशनल क्रश म्हणून घोषित केले. गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यावर रश्मिकाचा फोटो दिसतो. गुगलने सर्च इंजिनमध्ये रश्मिका नॅशनल क्रश असे नाव दिले आहे, त्यामुळे नॅशनल क्रश सर्च करताना फक्त रश्मिकाचा फोटो दिसतो.

'पुष्पा' या चित्रपटानंतर रश्मिकाने टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. आता ही अभिनेत्री दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे रश्मिका तिच्या एका चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेते.

वेगवेगळ्या चित्रपटांतील भूमिकेसाठी रश्मिकाला आतापर्यंत 6 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर रश्मिकाचे कर्नाटक, मुंबई, हैदराबाद आणि गोवा येथे घर आहे. याशिवाय तिच्या कलेक्शनमध्ये 4 लग्झरी गाड्यांचा समावेश आहे, ज्यात 1 कोटी रुपयांपर्यंतच्या वाहनांचा समावेश आहे. रश्मिकाची एकूण संपत्ती 35 कोटींच्या आसपास आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर रश्मिका 'किरिक' या कन्नड चित्रपटाच्या पार्टीत अभिनेता रक्षित शेट्टीच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर 3 जुलै 2017 रोजी दोघांनी साखरपुडादेखील केला होता, पण 2018 मध्ये आपसातील भांडणामुळे दोघांनी हे नाते संपुष्टात आणले. सध्या या अभिनेत्रीचे नाव अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे आणि अनेकदा त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या आहेत.

'पुष्पा' या चित्रपटानंतर रश्मिका अधिकच चर्चेत आली असून आता ती बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' आणि अमिताभ बच्चनसोबत 'गुड बाय' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्या रश्मिका मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रणबीर कपूरसोबत ती 'अॅनिमल' या चित्रपटातही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...